Ahmednagar Politics: शरद पवारांचा भाजपला धक्का? नगरमधील बडा नेता 'तुतारी' फुंकण्याची शक्यता; पुण्यात झाली भेट

Maharashtra Politics Latest News: अहमदनगरमध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. नगरमधील भाजप नेते विवेक कोल्हे हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असून आज ते पुण्यामध्ये शरद पवार यांची भेट घेणार आहेत.
Ahmednagar Politics: शरद पवारांचा भाजपला धक्का? नगरमधील बडा नेता 'तुतारी' फुंकण्याची शक्यता; पुण्यात भेट अन् आशीर्वाद
sharad pawar , devendra fadnavisSaam TV
Published On

सचिन बनसोडे| अहमदनगर, ता. २७ ऑगस्ट २०२४

विधानसभेचे वारे वाहू लागल्यापासून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. भारतीय जनता पक्ष तसेच महायुतीमधील अनेक बडे नेते विधानसभेच्या निवडणुकांआधी तुतारी हाती घेण्यास इच्छुक असल्याची चर्चा आहे. अशातच अहमदनगरमध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. नगरमधील भाजप नेते विवेक कोल्हे हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असून आज ते पुण्यामध्ये शरद पवार यांची भेट घेणार आहेत.

Ahmednagar Politics: शरद पवारांचा भाजपला धक्का? नगरमधील बडा नेता 'तुतारी' फुंकण्याची शक्यता; पुण्यात भेट अन् आशीर्वाद
Maharashtra Politics: विधानसभेला देवेंद्र फडणवीसांसमोर अनिल देशमुखांचे चॅलेंज? रोहित पवारांचे मोठे विधान; म्हणाले...

शरद पवारांचा भाजपला धक्का?

याबाबत अधिक माहिती अशी की, एकीकडे विधानसभेची मोर्चबांधणी सुरू असतानाच अहमदनगर जिल्ह्यामध्ये शरद पवार भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. नगरमधील कोपरगाव विधानसभेच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे पुत्र भाजप नेते विवेक कोल्हे हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. आज पुण्यामध्ये विवेक कोल्हे यांनी शरद पवार यांची भेट घेतली.

विवेक कोल्हे शरद पवारांची भेट

वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या गव्हर्निंग कौन्सिलची पुण्यातील मांजरी येथे बैठक पार पडत आहे. या बैठकीदरम्यान विवेक कोल्हे यांनी शरद पवारांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पाया पडत शरद पवार यांचे आशिर्वाद घेतले. या भेटीनंतर आता पुन्हा एकदा विवेक कोल्हे हे शरद पवार यांच्या गटामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा जोर धरु लागल्या आहेत.

Ahmednagar Politics: शरद पवारांचा भाजपला धक्का? नगरमधील बडा नेता 'तुतारी' फुंकण्याची शक्यता; पुण्यात भेट अन् आशीर्वाद
Accident News : पुन्हा हिट अँड रनचा थरार! फुटपाथवर झोपलेल्या 5 मजुरांना भरधाव ट्रकने चिरडलं; तिघांचा जागीच मृत्यू

कोपरगावमध्ये घड्याळ विरुद्ध तुतारी?

गणेश कारखाना निवडणुकीत विखे पाटलांचा पराभव केल्यानंतर विवेक कोल्हे राज्यभरात चर्चेत आले होते. नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीतही त्यांनी भाजपला आव्हान देतअ अपक्ष निवडणूक लढवली होती, तेव्हापासून कोल्हे यांनी भाजपमध्ये दुरावा वाढल्याची चर्चा आहे. दुसरीकडे कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार यांनी विद्यमान आमदार आशुतोष काळे यांची उमेदवारी निश्चित केल्याने कोल्हे यांची राजकीय अडचण झाली आहे. त्यामुळे ते तुतारी घेऊन विधानसभा लढण्यास इच्छुक आहेत. दरम्यान, कोल्हे शरद पवार गटात गेल्यास कोपरगावमध्ये घड्याळ विरुद्ध तुतारी लढत होण्याची शक्यता आहे.

Ahmednagar Politics: शरद पवारांचा भाजपला धक्का? नगरमधील बडा नेता 'तुतारी' फुंकण्याची शक्यता; पुण्यात भेट अन् आशीर्वाद
Ulhasnagar Crime News : भरचौकात राडा! किरकोळ वाद टोकाला; पाहा CCTV व्हिडिओ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com