पराग ढोबळे, नागपूर|ता. २६ ऑगस्ट २०२४
देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात नागपूर दक्षिण- पश्चिममधून अनिल देशमुख लढणार असतील तर महाविकास आघाडी म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा देतो, अनिल देशमुख उभे राहीले तर ते फडणवीस यांचा चांगले चॅलेंज देतील, असे सर्वात महत्वाचे विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केले आहे. नागपूरमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.
"अनिल देशमुख यांचा सोपा मार्ग होता तिकडे जायचं की, जेलमध्ये जायचं? काही लोक भितीनं गेले. अनिल देशमुख ईडीला घाबरले नसतील. तर मग ज्यांनी राजकारण खराब केलं त्या फडणवीस यांच्याविरोधात दक्षिण- पश्चिममधून अनिल देशमुख लढणार असतील तर महाविकास आघाडी म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा देतोय, असे रोहित पवार म्हणाले. तसेच सलील देशमुख, अनिल देशमुख यांच्या मतदारसंघातबाबात पवार साहेब ठरवतील, आमच्यात लोकशाही आहे" असेही त्यांनी सांगितले.
तसेच "नागपूर दक्षिण- पश्चिम मधून लढण्याबाबत अनिल देशमुख ठरवतील. पण फडणवीसांच्या मतदारसंघात गडकरी यांचे लीड कमी झाले आहे. तिथे नाराजी आहे. नागपूरात विकास बंद करा यासाठी आंदोलन होत आहे. अनिल देशमुख उभे राहीले तर ते फडणवीस यांना चांगले चॅलेंज देतील. तिथे काँग्रेसचेही नेते आहेत, जे चॅलेंज देऊ शकतात', असा विश्वासही रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.
"पार्थ पवार मोठे नेते आहेत. ते फक्त माझ्याच मतदारसंघात फिरतील असेल असं नाही. ते राज्यभर फिरू शकतात. त्यांचा पक्ष वेगळा आहे, मोठ्या नेत्यांबाबत आपण काय बोलणार? माझ्या विरोधात कोणी उभं रहावं, मतं खाण्यासाठी कितीही जणांना उभं करावं. पण तिथल्या जनतेवर माझा विश्वास आहे. कर्जत जामखेडच्या लोकांनी आम्हाला लढायला शिकवलं. कर्जत जामखेडला मी सोडणार नाही. तिथूनंच लढणार. गेल्यावेळेसपेक्षा जास्त लिड मिळेल," असेही रोहित पवार म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.