Vasant Chavan Passes Away: 'एकनिष्ठ, लढवय्या शिलेदार हरपला', वसंत चव्हाण यांच्या निधनाने शरद पवार, अशोक चव्हाण हळहळले!

Congress MP Vasant Chavan Passes Away: काँग्रेसचे निष्ठावान अशी ओळख असलेल्या वसंत चव्हाण यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे. काँग्रेस पक्षाने एक लढवय्या नेता गमावला असे म्हणत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह अनेकांनी चव्हाण यांच्या निधनावरुन शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे.
Vasant Chavan Passes Away: 'काँग्रेसचा एकनिष्ठ, लढवय्या शिलेदार हरपला', वसंत चव्हाण यांच्या निधनाने नाना पटोले, अशोक चव्हाण हळहळले!
Congress MP Vasant Chavan Passes Away: Saamtv
Published On

नांदेड, ता. २६ ऑगस्ट २०२४

नांदेडचे विद्यमान खासदार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत चव्हाण यांचे आज दुःखद निधन झाले. मध्यरात्री प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने महैद्राबादमधील किम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. पहाटे उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ६४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काँग्रेसचे निष्ठावान अशी ओळख असलेल्या वसंत चव्हाण यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह अनेकांनी चव्हाण यांच्या निधनावरुन शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे.

विनम्र, अनुभवी नेतृत्व गेले: शरद पवार

नांदेडच्या जनतेशी थेट संपर्क ठेवणारे विनम्र आणि अनुभवी नेतृत्व आज हरपले. काँग्रेस पक्षाचे विद्यमान खासदार वसंत चव्हाण यांची दीर्घ आजाराने प्राणज्योत मालवली. राजकारण आणि सहकार क्षेत्रात त्यांचे काम लक्ष वेधणारे आहे. जनकल्याणासाठी त्यांनी केलेला राजकीय प्रवास हा लक्षणीय आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी त्यांचे असलेले जुने संबंध सदैव स्मरणात राहतील. त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहावेदना व्यक्त करून वसंत चव्हाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हळहळले

"काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार वसंतरावजी चव्हाण यांच्या निधनाची वार्ता अत्यंत धक्कादायक आहे. प्रतिकूल परस्थितीत देखील त्यांनी काँग्रेस पक्षाशी सदैव एकनिष्ठ राहून काँग्रेस पक्षाचा विचार घरोघरी पोहोचवला. वसंतरावजी चव्हाण साहेबांना जड अंतःकरणाने श्रद्धांजली अर्पण करतो. चव्हाण कुटुंबियांवर कोसळलेल्या या दुःखात संपूर्ण काँग्रेस पक्ष त्यांच्यासोबत आहे," असे म्हणत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

लढवय्या नेता हरपला : बाळासाहेब थोरात

"काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, नांदेड लोकसभेचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दु:खद आहे. काँग्रेस पक्षाने एक लढवय्या नेता आणि आपण एक सहकारी गमावला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून त्यांनी नांदेड जिल्ह्यात काँग्रेस विचार टिकवून ठेवला. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. आम्ही सर्वजण चव्हाण कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहोत.

Vasant Chavan Passes Away: 'काँग्रेसचा एकनिष्ठ, लढवय्या शिलेदार हरपला', वसंत चव्हाण यांच्या निधनाने नाना पटोले, अशोक चव्हाण हळहळले!
Pune Police Attack : पुण्यात कोयता गँगची वाढली हिंमत, थेट पोलीस अधिकाऱ्यावरच केला हल्ला

काँग्रेसच्या विचारांचा सच्चा पाईक हरपला: विजय वडेट्टीवार

नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार वसंतरावजी चव्हाण यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. काँग्रेस विचारांशी एकनिष्ठ राहून त्यांनी कठीण काळात काँग्रेस पक्षाला साथ दिली आणि नांदेड जिल्ह्यात पक्ष संघटना टिकवून ठेवली होती. काँग्रेस पक्ष हेच आपले कुटुंब आहे या भावनेने ते आयुष्यभर काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले. काँग्रेस विचारांचा सच्चा पाईक असणाऱ्या वसंतरावजी चव्हाण यांच्या निधनाने पक्षाची मोठी हानी झाली आहे. वसंतरावजी चव्हाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या कठीण प्रसंगी चव्हाण कुटुंबाच्या आणि मित्र परिवाराच्या दुःखात सहभागी आहोत, असे म्हणत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

भाजप नेते अशोक चव्हाणही गहिवरले!

"अतिशय दुखद घटना आहे. मध्यंतरी त्यांना त्रास झाला त्यानंतर त्यांना हैदराबाद येथे हालवण्यात आले. असं वाटत होतं की ते बरे होतील पण हा धक्कादायक असा प्रसंग आहे. काँग्रेसमध्ये असताना आम्ही एकत्र काम केले आहे. जिल्ह्याच्या राजकारणात आम्ही एकत्रपण होतो. त्यांचा प्रवास मी जवळून पाहिला आहे. अनेक वेळा कठीण प्रसंगात देखील त्यांची साथ आम्हाला वेळोवेळा मिळत आली आहे. त्यांच्या जाण्याने मला तीव्र दुखः झाले आहे," असे भारतीय जनता पक्षाचे नेते अशोक चव्हाण म्हणाले.

Vasant Chavan Passes Away: 'काँग्रेसचा एकनिष्ठ, लढवय्या शिलेदार हरपला', वसंत चव्हाण यांच्या निधनाने नाना पटोले, अशोक चव्हाण हळहळले!
Maharashtra Politics: पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला दे धक्का? बेनके, भोसले, पाटील शरद पवारांच्या गळाला?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com