सुशिल थोरात|अहमदनगर, ता. २६ ऑगस्ट २०२४
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे विधानसभा प्रमुख प्रा मधुकर राळेभात यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप करत पक्षाला रामराम ठोकला आहे. रोहित पवार यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून पक्ष सोडत असल्याचे राळेभात यांनी म्हटले आहे.
एकीकडे विधानसभा निवडणुकांची मोर्चेबांधणी सुरु असतानाच आमदार रोहित पवार यांना कर्जत- जामखेड मतदारसंघामध्ये मोठा धक्का बसला आहे. कर्जत व जामखेडमधील स्वाभिमानी नेते व कार्यकर्त्यांनी रोहित पवारांविरोधात बंडाचे निशाण फडकावले असून 2019 च्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवारांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान केलेले जेष्ठ नेते मधुकर राळेभात यांनी पक्षाला रामराम ठोकण्याची घोषणा केली आहे.
रोहित पवार यांच्या एकाधिकारशाही मनमानी कारभारामुळे हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मधुकर राळेभात हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते तथा राष्ट्रवादीचे विधानसभा प्रमुख होते. राळेभात यांच्या या निर्णयामुळे रोहित पवारांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
"मागील विधानसभा निवडणुकीत देशाचे नेते शरद पवार यांचा आदर ठेवून आम्ही रोहित पवार यांना निवडून आणले. परंतु गेल्या साडेचार वर्षामध्ये आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष न ठेवता बारामती ॲग्रोलिमिटेडच्या कामगारांसारखी सर्व कार्यकर्त्यांना, नेत्यांना वागणूक दिली. असा गंभीर आरोप यावेळी राळेभात यांनी केला.कोणत्याही कार्यकर्त्याचा सन्मान ठेवला नाही. सतत अपमानकारक वागणूक दिली. एकाधिकारशाहीने कारभार केला. याचा आम्हा स्वाभिमानी कार्यकर्त्यांना प्रचंड त्रास झाला,"
"जनतेची कामे होत नव्हती. जनतेच्या कामासाठी त्यांच्या पीएंना फोन केला तर ते फोन उचलत नव्हते. स्वता: रोहित पवारांचे मतदारसंघाकडे दुर्लक्ष व्हायचे. हम करे सो कायदा या प्रमाणे त्यांचा कारभार असायचा. ज्या अपेक्षेने आम्ही त्यांना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान केले ते सर्व फेल ठरलं. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यात रोहित पवार हे अपयशी ठरल्याचा ठपकाही मधुकर राळेभात यांनी केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.