उल्हासनगर : उल्हासनगर शहरात पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. उल्हासनगरमध्ये किरकोळ वाद टोकाला गेला आहे. उल्हासनगरमध्ये पार्किंगच्या किरकोळ वादातून हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. फैजान शेख नावाच्या तरुणावर हा हल्ला करण्यात आला आहे. फैजानवर लोखंडी कड्याने हल्ला केला आहे. या हाणामारीचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगर शहरातील कॅम्प ५ येथील कैलास कॉलनीमध्ये किरकोळ वाद टोकाला गेला. शहरात १५ दिवसांपूर्वी जयकाली ग्रुप गणपती मंडळाजवळ राहणाऱ्या मंगेश आणि फैजान शेख यांच्यात मोटरसायकल पार्किंगच्या कारणावरून वाद झाला होता. फैजानने मंगेशची मोटरसायकल रस्त्याच्या कडेला उभी केल्यामुळे दोघांमध्ये वादविवाद आणि शिवीगाळ झाली होती. या वादाचा राग मनात ठेवून मंगेशने आपल्या दोन साथीदारांसह फैजानवर हल्ला केला.
फैजानने मित्राची वाट पाहत असताना, मंगेशने लोखंडी कड्याने त्याच्या तोंडावर हल्ला केला. या हल्ल्यामुळे फैजान गंभीर जखमी झाला. या हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेमुळे उल्हासनगर शहरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. सदर घटनेची माहिती मिळताच हिललाईन पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि प्रकरणाची नोंद केली. हल्लेखोर मंगेश आणि त्याचे साथीदार सध्या फरार आहेत, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी सुरक्षेची उपाययोजना केली आहे. उल्हासनगरमधील ही घटना २० ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता घडली होती. या घटनेचे सीसटीव्ही फुटेज हाती आला आहे.
पुण्यातही आज सोमवारी हाणामारी झाल्याची घटना घडली. शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही हाणामारीची घटना घडली आहे. या प्रकरणी वकील आणि त्याच्या आईविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. वारंवार तक्रारी करूनही पोलिसांचं वकील व त्याच्या आईकडे दुर्लक्ष केल्याचा तक्रारकर्त्यांचा आरोप आहे. शेजारी राहणाऱ्या महिलेला मारहाण करून हॉटेल चालकांना हॉटेल बंद करण्याची धमकी दिल्याचा आरोप वकिलावर आहे. धमकी देणारा अमर जाधव हा वकील असून या आधी देखील त्याच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.