अजय दुधाणे, साम टीव्ही अंबरनाथ
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती चांगलीच अलर्ट मोडवर आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीने विधानसभेसाठी पक्षांतर्गत धोरण बदलायचं ठरवलं. तर पक्षांतर्गत ऑपरेशनला सुरूवात झालीय. शिवसेनेची अंबरनाथ आणि उल्हासनगर शहर कार्यकारिणी बरखास्त करण्यात आलीय. पक्षांतर्गत गटबाजी आणि लोकसभा निवडणुकीत अपेक्षेनुसार न झालेली कामगिरी या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे. आता मुलाखती घेऊन नवीन कार्यकारणी निवडली जाणार असल्याची घोषणा कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी केलीय.
वरिष्ठांचा महत्वाचा निर्णय...,
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अंबरनाथ आणि उल्हासनगर शहरांमध्ये पक्षांतर्गत गटबाजी मोठ्या प्रमाणात दिसून आली होती. अंबरनाथ शहरात तर शिवसेनेची नगरपालिकेवरील एकहाती सत्ता आणि शिवसेनेचेच आमदार असताना देखील (Shiv Sena Shinde Group Ambernath Ulhasnagar Executive Dissolve) खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना देखील या निवडणुकीत अपेक्षित मताधिक्य मिळू शकले नसल्याचं वरिष्ठांनी म्हटलंय. पक्षांतर्गत गटबाजी आणि लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर वरिष्ठांनी एक महत्वाचा निर्णय घेतलाय.
पक्षांतर्गत हेवेदावे आणि गटबाजीचा फटका
कल्याण लोकसभेतील सर्वाधिक आणि मोठी विकासकामं अंबरनाथ शहरात झाली, तरीही केवळ पक्षांतर्गत हेवेदावे आणि गटबाजीचा फटका बसल्याने मताधिक्य (Vidhan Sabha Election) कमी झाल्याची बाब वरिष्ठांच्या चांगलीच जिव्हारी लागली होती. निवडणुकीनंतर झालेल्या आढावा बैठकीतही जाणीवपूर्वक शहरप्रमुखांचा फोटो न टाकल्यानं हा वाद आणखी उफाळून आला होता. त्यामुळे अखेर शिवसेनेची उल्हासनगर आणि अंबरनाथ शहर कार्यकारणी बरखास्त करण्याचे आदेश कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी दिले (Maharashtra Politics) आहेत.
नवी कार्यकारिणी कशी निवडली जाणार?
तसंच १८ जुलै रोजी अंबरनाथ शहरात, तर १९ जुलै रोजी उल्हासनगर शहरात नवीन इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत. त्यानंतर नवीन कार्यकारणी घोषित केली जाणार असल्याची माहिती देखील जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी (Shiv Sena Shinde Group) दिलीय. मात्र या सगळ्यानंतर पक्षांतर्गत गटबाजी कमी होणार? की उलट आणखी उफाळून येणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मुलाखती घेऊन पुढील कार्यकारणी निवडली जाणार असल्याची माहिती समोर आलीय.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.