Shiv Sena News: ब्रेकिंग! उद्धव ठाकरेंनी एकाच दगडात मारले दोन पक्षी; वंचितसोबत मनसेलाही पाडलं मोठं खिंडार

Vanchit Leader Vasant More Join Thackeray Group With MNS Activist: वंचितचे नेते वसंत मोरे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह आज ठाकरे गटात प्रवेश केलाय. त्यामुळे वंचितसोबत मनसेलाही मोठं खिंडार पडलं आहे.
 वसंत मोरे ठाकरे गटात प्रवेश
Shiv Sena NewsSaam Tv

मुंबई, ता. ९ जुलै २०२४

विधानसभेसाठी उद्धव ठाकरेंनी रणनिती आखण्यास सुरूवात केली असून पहिलाच दणका वंचित आणि मनसेला दिलाय. वंचितकडून लोकसभेची निवडणूक वसंत मोरे यांनी आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केलाय. त्यांच्यासोबत पुण्यातील १७ मनसैनिकांनी देखील शिवबंधन बांधलं आहे. पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक वसंत मोरे (Vanchit Leader Vasant More) यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह आज शिवसेना ठाकरे गटात जाहीर प्रवेश केलाय.

विधानसभेसाठी उद्धव ठाकरेंची रणनिती

वसंत मोरे यांचा हा प्रवेश सोहळा ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला आहे. आज वंचितचे नेते वसंत मोरे यांच्यासोबत १७ मनसे सैनिकांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याने वंचितसोबत मनसेलाही मोठं खिंडार पडलं असल्याचं समोर आलंय. आज विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची मोठी खेळी समोर आलीय.

वसंत मोरेंचा ठाकरे गटात प्रवेश

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) एकाच दगडात दोन पक्षी मारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. गेल्या काही दिवसांपासून वसंत मोरे ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. आता या चर्चांना पूर्णविराम लागला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतून उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला होता. पुण्यातून वसंत मोरेंनी लोकसभेची निवडणूक देखील लढवली होती, परंतु त्यांना पराभवाला सामोरे जावं लागलं (Vidhan Sabha Election) होतं.

 वसंत मोरे ठाकरे गटात प्रवेश
Shiv Sena News Today: 'शिवसैनिकांनो, वाघांनो...' नवी दिल्लीत लागलेल्या बॅनरमुळे चर्चांना उधाण!

उध्दव ठाकरे काय म्हणाले?

वसंत मोरेंच्या प्रवेश सोहळ्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, मोरेंना शिवसेनेत सामावून घेताना आनंद होत आहे. लोकसभा निवडणुकी आधी वसंतराव काय करायचे हा त्यांचा प्रश्न आहे. मधल्या काळात त्यांनी शिवसेना पक्षाबहेर अनुभव (Vasant More Join Thackeray Group) घेतला. शिवसेना पुण्यात वाढली पाहिजे ही त्यांच्यावर जबाबदारी आहे. ही जबाबदारी समजून काम करा, असं उद्धव ठाकरे प्रवेशसोहळ्यावेळी म्हणाले आहेत. आता पुण्यात शिवसैनिकांच्या मेळाव्याला येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

 वसंत मोरे ठाकरे गटात प्रवेश
Shiv Sena Benner News: ठाकरे आणि शिंदे एकत्र येणार? नवी दिल्लीतल्या बॅनरवर दोन्ही गटाच्या नेत्यांचं सूचक विधान, काय म्हणाले?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com