Shiv Sena News Today: 'शिवसैनिकांनो, वाघांनो...' नवी दिल्लीत लागलेल्या बॅनरमुळे चर्चांना उधाण!

New Delhi Shiv Sena Banner News Today: शिवसैनिकांना भावनिक साद घालणारा नवी दिल्लीतला बॅनर चर्चेत, बॅनरमधून नेमकं आवाहन काय?

नवी दिल्लीत शिवसेनेच्या एका बॅनरची चर्चा रंगली आहे. दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात अशा आशयाची एक बॅनर लावण्यात आले आहेत. नवी दिल्लीतील या बॅनरमधून शिवसैनिकांना भावनिक साद घालण्यात आली आहे. शिंदे आणि ठाकरे या दोघांच्या गटातील शिवसैनिकांना साद घालण्याचा प्रयत्न बॅनरमधून करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीत ठाकरेंनी शिंदेंविरोधात लढत देत जोरदार मुसंडी मारली. लोकसभेत ९ खासदार ठाकरेंनी निवडून आणले. तर शिंदेंचे ७ खासदार निवडून आले. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता एनडीए सरकारचा शपथविधी सोहळाही पार पडला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी नवी दिल्लीत लागलेल्या या बॅनरमुळे चर्चांना उधाण आलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com