Shiv Sena Crisis : मोठी बातमी! शिवसेना ठाकरे गटाच्या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली; पुढची तारीख कोणती?

Shiv Sena Supreme Court Hearing : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर उद्या म्हणजेच १५ जुलै रोजी सुनावणी होणार होती. मात्र, ही सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आहे.
Shiv Sena Party and Symbol Hearing
Uddhav Thackeray vs Eknath ShindeSaam TV
Published On

प्रमोद जगताप, साम टीव्ही

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर उद्या म्हणजेच १५ जुलै रोजी सुनावणी होणार होती. मात्र, ही सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचं टेन्शन वाढलं आहे. आता ऑगस्ट महिन्यात या प्रकरणाची सुनावणी होण्याची शक्यता आहे. विशेष बाब म्हणजे मागील ५ महिन्यांपासून या प्रकरणावर सुनावणी झालेली नाही.

Shiv Sena Party and Symbol Hearing
Cabinet Expansion : अजित पवार तडकाफडकी दिल्लीला, काहीतरी मोठं घडणार; आमदारांची धाकधूक वाढली

एकनाथ शिंदे यांच्यासह ४० हून अधिक आमदारांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. त्यानंतर आम्ही खरी शिवसेना असा दावा करत एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगात धाव घेतली. निवडणूक आयोगाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच असा निर्णय दिला. या निर्णयामुळे शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला.

शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह अचानक हातातून गेल्यानंतर ठाकरे गटाने (Uddhav Thackeray)  निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले. एकनाथ शिंदे यांना पक्ष आणि चिन्ह देण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय हा चुकीचा तसेच पक्षपाती असल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाने आपल्या याचिकेतून केलेला आहे.

दरम्यान,  सुप्रीम कोर्टाची (Supreme Court) उन्हाळी सुट्टी असल्यामुळे गेल्या ५ महिन्यांपासून या प्रकरणावर कोणतीही सुनावणी झालेली नाही. त्यामुळे सुनावणी कधी होणार याची वाट शिवसैनिक पाहत होते. ८ जुलै रोजी सुप्रीम कोर्टाची उन्हाळी सुट्टी संपली. त्यानंतर ठाकरे गटाच्या याचिकेवर १५ जुलै रोजी सुनावणी होणार, अशी माहिती समोर आली होती.

मात्र, ही सुनावणी पुन्हा एकदा लांबवणीवर पडल्याची माहिती आहे. येत्या ऑगस्ट महिन्यात या प्रकरणावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी या प्रकरणावर निकाल द्यावा, अशी इच्छा ठाकरे गटाची आहे. त्यामुळे आता ऑगस्ट महिन्यातील सुनावणी नेमकं काय होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून असेल.

Shiv Sena Party and Symbol Hearing
Rahul Gandhi : भय अन् भ्रमाचं जाळं तुटलं, पोटनिवडणुकीतील यशानंतर राहुल गांधी यांची भाजपवर खरमरीत टीका

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com