Chhattisgarh Crime: एकाच घरात चार मृतदेह, काँग्रेस नेत्याने संपूर्ण कुटुंबासह संपवलं आयुष्य; धक्कादायक कारण समोर

Chhattisgarh Congress Leader Family Death: घटनेत मोठ्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर काँग्रेस नेते, त्यांची पत्नी आणि लहान मुलाला गंभीर अवस्थेत बिलासपूरच्या सिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथे रविवारी (1 सप्टेंबर) सकाळी उपचारादरम्यान तिघांचाही मृत्यू झाला.
Chhattisgarh Crime: एकाच घरात चार मृतदेह, काँग्रेस नेत्याने संपूर्ण कुटुंबासह संपवलं आयुष्य; धक्कादायक कारण समोर
हत्या केल्याची घटनाSaam Tv
Published On

छत्तीसगड: काँग्रेस नेत्याने पत्नी आणि दोन मुलांसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना छत्तीसगडमधून समोर आली आहे. छत्तीसगडच्या जांजगीर चांपा जिल्ह्यात घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. कर्जबाजारीपणामुळे हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात असून काळीज पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Chhattisgarh Crime: एकाच घरात चार मृतदेह, काँग्रेस नेत्याने संपूर्ण कुटुंबासह संपवलं आयुष्य; धक्कादायक कारण समोर
Pune Accident : पुण्यात भीषण अपघात; १० वाहने एकमेकांना धडकली, घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी, VIDEO

छत्तीसगडमधून एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. छत्तीसगडच्या जांजगीर-चंपा जिल्ह्यामध्ये एका काँग्रेस नेत्याने कुटुंबासह आत्महत्या केली आहे. काँग्रेस नेत्याने पत्नी आणि दोन मुलांसह विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. या घटनेत मोठ्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर काँग्रेस नेते, त्यांची पत्नी आणि लहान मुलाला गंभीर अवस्थेत बिलासपूरच्या सिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथे रविवारी (1 सप्टेंबर) सकाळी उपचारादरम्यान तिघांचाही मृत्यू झाला.

काँग्रेस नेते पंचराम यादव (६६ वर्षे), त्यांची पत्नी दिनेश नंदानी यादव (५५ वर्षे), मोठा मुलगा नीरज यादव (२८ वर्षे) आणि धाकटा मुलगा सूरज यादव (२५ वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. या सर्वांनी 30 ऑगस्ट रोजी एकत्र विष प्राशन केले होते. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संपूर्ण कुटुंब कर्जात झाल्याने त्यांनी हे पाऊल उचलल्याचा संशय आहे.

Chhattisgarh Crime: एकाच घरात चार मृतदेह, काँग्रेस नेत्याने संपूर्ण कुटुंबासह संपवलं आयुष्य; धक्कादायक कारण समोर
Maharashtra Politics: 'महाराष्ट्रात दंगल घडवण्याचा डाव', निलेश राणेंच्या वक्तव्यानं खळबळ; कोणाला घडवायचीये राज्यात दंगल?

जंजगीर नगरपालिकेत कंत्राटदार म्हणून काम करायचे. त्यांनी काही कर्ज घेतले होते, ते कर्ज चुकवता न आल्याने संपूर्ण कुटुंब तणावाखाली होते. याच नैराश्यातून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. घटनेदिवशी यादव यांच्या कुटुंबाने कोणाला संशय येऊ नये म्हणून घराच्या मुख्य दरवाजाला बाहेरुन कुलूप लावले आणि मागच्या दाराने प्रवेश करत सामुहिक आत्महत्या केली.

घटनेनंतर शेजारील मुलगी त्यांच्या घराकडे आली मात्र फोन करुनही कोणीही दार उघडत नसल्याने त्यांना संशय आला आणि तिने आजूबाजूच्या लोकांना माहिती दिली. यानंतर शेजारी आणि नातेवाईक घरात गेले तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.

Chhattisgarh Crime: एकाच घरात चार मृतदेह, काँग्रेस नेत्याने संपूर्ण कुटुंबासह संपवलं आयुष्य; धक्कादायक कारण समोर
Mumbai Crime : तरूणीचा टेरेसवरून झोपेत पडून मृत्यू; घटनेत मोठा ट्विस्ट, नेमकं काय घडलं?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com