Maharashtra Politics: 'महाराष्ट्रात दंगल घडवण्याचा डाव', निलेश राणेंच्या वक्तव्यानं खळबळ; कोणाला घडवायचीये राज्यात दंगल?

Nilesh Rane News: मालवणमधील महाराजांचा पुतळा कोसळल्यावरुन संतापाचं वातावरण असतानाच माजी खासदार निलेश राणेंच्या वक्तव्यानं खळबळ उडाली आहे. दंगल घडवण्याचा कट रचला जातोय, असं विधान निलेश राणेंनी केलंय.
'महाराष्ट्रात दंगल घडवण्याचा डाव', निलेश राणेंच्या वक्तव्यानं खळबळ; कोणाला घडवायचीये राज्यात दंगल?
Nilesh RaneSaam Tv
Published On

मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यावरुन संतापाचं वातावरण आहे. राज्यात निदर्शने, आंदोलन होतायेत. अशा स्थितीतच रत्नागिरी शहरातील एका घटनेनं आगीत तेल ओतण्याचं काम केलं आहे.

मारुती मंदिर सर्कलमध्ये असलेल्या शिवसृष्टीतील मावळ्यांमधल्या काही पुतळ्यांची तोडफोड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शिवप्रेमींनी संताप व्यक्त करत पोलिसांकडे तक्रार केली. कोकणातील या दोन्ही घटनांच्या पार्श्वभूमिवर माजी खासदार निलेश राणे यांनी महाराष्ट्रात दंगल घडवण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप केलाय. रत्नागिरी मधील मारुती मंदिराजवळ हिंदू समाजानं जमण्याचं आवाहन देखील त्यांनी केलय.

'महाराष्ट्रात दंगल घडवण्याचा डाव', निलेश राणेंच्या वक्तव्यानं खळबळ; कोणाला घडवायचीये राज्यात दंगल?
Shivaji Maharaj Statue: मालवणची घटना, ठाकरेंचे आमदार अन् ती १५ मिनिटे; राणेंचा खळबळजनक आरोप काय?

रत्नागिरी नगरपरिषदेवर शिवप्रेमींनी धडक देत मुख्याधिकारी तुषार बाबर यांना घेराव घातला. पुतळ्याची विटंबना होण्यापेक्षा पुतळे उभारुच नका अशी संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. शिवप्रेमींच्या आक्रमक भूमिकेनंतर संबंधित नगरपालिका अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. दंगलीच्या मुद्यावरुन नारायण राणे, निलेश राणे या राणे पिता-पुत्रांचा रोख ठाकरे गटाकडे आहे. मात्र दुसरीकडे राणेंचे पुत्र आमदार नितेश राणेंविरुद्ध चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून आमदार नितेश राणे यांनी हिंदू जनआक्रोश मोर्चात वादग्रस्त विधानं केली आहेत. 'मी चालायला लागलो तर लोक दारं बंद करतात. मी हिंदूंचा गब्बर आहे, असं विधान अहमदनगरमध्ये नितेश राणे यांनी केलंय. दुसरीकडे एका कार्यक्रमात त्यांनी मुस्लिमांना निवडून मारणार असल्याची धमकी दिली होती. या प्रकरणी नितेश राणेंवर दोन ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'महाराष्ट्रात दंगल घडवण्याचा डाव', निलेश राणेंच्या वक्तव्यानं खळबळ; कोणाला घडवायचीये राज्यात दंगल?
Vanraj Andekar : गँगवॉर, राजकरण अन् वर्चस्वाची लढाई, पुण्यातील आंदेकर कुटुंबाचा रक्तरंजित इतिहास; वाचा...

लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुती आणि मविआमध्ये काँटे की टक्कर झाली होती. महायुतीची पिछेहाट झाली. मात्र विभानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर राज्यातला राजकीय संघर्ष टोकाला गेलाय. आधीच मराठा आरक्षणावरुन मराठा, ओबीसींमध्ये संघर्ष उडाला असतानाच आता महाराजांच्या पुतळ्यावरुन राजकारण सुरु आहे. मात्र महाराष्ट्राची सुज्ञ जनता दंगली घडवणाऱ्यांचे मनसुबे उधळून लावणार यात शंकाच नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com