Maharashtra Politics : छत्रपती शिवाजी महाराजांनी दोनदा सुरत कशी लुटली? ठाकरे गटाने थेट इतिहासच सांगितला

Maharashtra Political News : छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरत लुटलीच नव्हती. काँग्रेसने देशाला चुकीचा इतिहास शिकवला, असं विधान भाजप नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं.
देवेंद्र फडणवीस
Uddhav Thackeray and Devendra Fadnavis SAAM TV
Published On

छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरत लुटलीच नव्हती. काँग्रेसने देशाला चुकीचा इतिहास शिकवला, असं विधान भाजप नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. त्यांच्या या विधानावरून मोठा वाद निर्माण झालाय. शिवसेना ठाकरे गटाने सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं असून फडणवीसांवर टीकेची झोड उठवली आहे. छत्रपती शिवरायांनी एकदा नव्हे तर दोनदा सुरत लुटली, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे. इतकंच नाही, तर सामनाच्या अग्रलेखातून इतिहासाचे दाखलेही देण्यात आले आहेत.

देवेंद्र फडणवीस
Vidhan Sabha Election : सिल्लोडमधून अब्दुल सत्तारांचा गेम होणार? सुरेश बनकर यांना अदृश्य शक्तीचं बळ

"शिवरायांचा मर्दानी इतिहास संपविण्यासाठी फडणवीस यांनी सुरू केलेल्या मोहिमेचाच हा एक भाग आहे. शिवराय व त्यांनी घडवलेल्या इतिहासाचा आणखी एक अपमान करण्याचा प्रमाद देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. छत्रपतींचा रोज एक अपमान करावा असे धोरण फडणवीस व त्यांच्या भाजपने स्वीकारले आहे काय?" असा सवाल सामनाच्या अग्रलेखातून फडणवीसांना विचारण्यात आलाय.

"महाराजांनी सुरत लुटली ती स्वराज्यासाठी व त्यावेळी काँग्रेसचा जन्म झाला नव्हता. इंग्रज, पोर्तुगीज इतिहासकारांनी महाराजांनी केलेल्या सुरतेवरील स्वारीची पक्की नोंद घेतली आहे, पण म.मो.पाध्याय फडणवीसांना ते मान्य नाही. मालवणात शिवरायांच्या पुतळ्याची मोडतोड केली त्याप्रमाणे इतिहासाचीही मोडतोड करण्याची सुपारी त्यांनी घेतली आहे", अशी टीकाही सामनातून करण्यात आली.

"शिवाजी महाराजांनी सुरत एकदा नव्हे, दोनवेळा लुटली. सुरतेच्या दुसऱ्या लुटीची बातमी युरोपमधील ‘द लंडन गॅझेट’ या दैनिकात 20 फेब्रुवारी 1672 रोजी पहिल्या पानावर प्रसिद्ध झाली होती. 352 वर्षे जुन्या अत्यंत दुर्मिळ अशा वर्तमानपत्राची अस्सल प्रत पुण्याच्या मालोजीराव जगदाळे यांनी मिळवून भारतात आणली. त्यामुळे सुरतच्या लुटीवर ज्या ‘संघी’ इतिहासकारांनी कायम प्रश्नचिन्ह निर्माण केले ते उघडे पडले", असं सामनात नमूद करण्यात आलंय.

"महाराजांनी सुरत लुटली याची नोंद लंडनमधील ऐतिहासिक संग्रहालयात आहे व महाराजांच्या नकली, बनावट वाघनखांची राजकीय मिरवणूक काढणाऱ्या फडणवीस यांनी सुरत लुटीचा इतिहास इंग्लंडला जाऊन नजरेखालून घालायला हवा. शिवाजी महाराजांच्या सुरतेवरील स्वारीची माहिती सुरतेत असणाऱ्या इंग्रजी अधिकाऱ्यांनी ‘द लंडन गॅझेट’च्या संपादकांना पाठवली होती. ती जशीच्या तशी प्रसिद्ध झाली", असंही सामना अग्रलेखात मांडण्यात आलं.

"शिवाजी महाराजांना स्वराज्य उभारणीसाठी धनाची आवश्यकता होती. सुरत हे मुघलांचे प्रमुख बंदर होते. याच बंदरातून मुघलांचा व्यापार पर्शियन आखातापर्यंत चालायचा. इथे अनेक धनाढय़ व्यापारी होते. त्यामुळे सुरत लुटली तर मुघलांना जरब बसेल आणि स्वराज्य निर्मितीसाठी हाती संपत्ती येईल या विचाराने महाराजांनी सुरतेवर स्वारी केली. सर जदुनाथ सरकार यांनी त्यांच्या ‘Shivaji and his Times’ या ग्रंथात सुरत लुटीची कहाणी पुराव्यासह मांडली आहे", असा दाखलाही सामना अग्रलेखातून देण्यात आला.

"सुरतमध्ये तेव्हा इंग्रजांच्या वखारी होत्या. सुरतमध्ये पोर्तुगीजांचीही वळवळ सुरू होती. या सगळ्यांकडे अफाट संपत्ती होती व मोगलांना त्यातील मोठा वाटा मिळत होता. मोगलांच्या आर्थिक नाड्या तोडण्यासाठी सुरत लुटायला हवी हे महाराजांचे धोरण होते व त्यानुसार सुरतवर स्वारी करून महाराजांनी दाणादाण उडवली, हे ऐतिहासिक सत्य असताना महामहोपाध्याय फडणवीस शिवरायांचा नवा इतिहास मांडून काय साध्य करीत आहेत?" असा सवालही सामना अग्रलेखातून करण्यात आला.

देवेंद्र फडणवीस
ST Employees Strike : लालपरीची चाके थांबली! एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला सुरुवात; कोणत्या मार्गावरील बसेस बंद? पाहा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com