Bhushansingh Raje Holkar: अहिल्यादेवी होळकरांचे वंशज भूषणसिंहराजेंच्या हाती तुतारी, शरद पवार गटात प्रवेश

Bhushansingh Raje Holkar Join Sharad Pawar Group: आगामी लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election 2024) भूषणसिंह होळकर यांनी आपल्या हाती तुतारी घेतली आहे. भूषणसिंह होळकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी वर्णी लागली.
Bhushansingh Raje Holkar
Bhushansingh Raje HolkarSaam Tv

राजमाता अहिल्यादेवी होळकर (Ahilya Devi Holkar) आणि मल्हारराव होळकर यांचे वंशज भूषणसिंहराजे होळकर (Bhushan Singh Raje Holkar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Nationalist Congress Sharadchandra Pawar Group) गटात प्रवेश केला. पुण्यामध्ये आज महाविकास आघाडीचे उमेदवार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, रविंद्र धंगेकर यांनी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यानंतर महाविकास आघाडीची रॅली झाली. या रॅलीमध्ये भूषणसिंहराजे होळकर यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला. आगामी लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election 2024) भूषणसिंह होळकर यांनी आपल्या हाती तुतारी घेतली आहे. भूषणसिंह होळकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी वर्णी लागली.

पुण्यामध्ये आज महायुतीच्या उमेदवारांनी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर महाविकास आघाडीची रॅली झाली. यावेळी महाविकास आघाडीतील अनेक प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली. महाविकास आघाडीच्या या प्रचार रॅलीमध्येच भूषणसिंह होळकर यांनी आज शरद पवार गटामध्ये केला. भूषणसिंह होळकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या स्टार प्रचारकांच्या यादीत देखील भूषणसिंह होळकर यांचा समावेश आहे.

Bhushansingh Raje Holkar
Madha Loksabha: माढ्यात नवा ट्वीस्ट! 'शेकाप'मध्ये फूट पडण्याची शक्यता; अनिकेत देशमुख अपक्ष अर्ज भरणार?

भूषणसिंहराजे होळकर हे आधी भाजपसोबत होते. पण गेल्या काही दिवसांपासून त्यांची शरद पवारांसोबत जवळीक वाढली होती. भूषणसिंह यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यातील शरद पवार यांच्या कार्यालयात त्यांची भेट घेतली होती. या भेटीपासूनच भूषणसिंह हे शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर आज त्यांनी महाविकास आघाडीच्या पुण्यातील रॅलीमध्ये तुतारी हाती घेत शरद पवार गटामध्ये अधिकृतरित्या प्रवेश केला आहे.

Bhushansingh Raje Holkar
Sushma Andhare : सुषमा अंधारेंनी भरसभेत सांगितली वाघांची गोष्ट; पुण्यात जोरदार भाषण

भूषणसिंह होळकर यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केल्यामुळे या पक्षाची ताकद वाढली आहे. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे शरद पवार यांना बारामती लोकसभा मतदारसंघात मोठा फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण या मतदारसंघामध्ये धनगर मतदारांची संख्या जास्त आहे. भूषणसिंहराजे होळकर यांच्याकडून धनगर मतदारांना एकत्रित करण्याचा आणि आकर्षित करण्याचा प्रयत्न शरद पवार गटाकडून गेला जाऊ शकतो. यामुळे सुप्रिया सुळे यांना या मतदार संघात अधिक मत मिळवण्यासाठी फायदा होऊ शकतो.

Bhushansingh Raje Holkar
Jayant Patil Speech: दिवस बिघडायला लागले; बॅलन्स जायला लागला... जयंत पाटलांचा अजित पवारांना टोला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com