Sushma Andhare : सुषमा अंधारेंनी भरसभेत सांगितली वाघांची गोष्ट; पुण्यात जोरदार भाषण

Sushma Andhare Latest News : महाविकास आघाडीकडून आयोजित सभेत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे भरसभेत विरोधकांवर जोरदार कडाडल्या. सुषमा अंधारे यांनी भरसभेत वाघांची गोष्ट सांगत विरोधकांवर निशाणा साधला.
Sushma Andhare :
Sushma Andhare :Saam tv

पुणे : लोकसभा निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांसाठी प्रतिष्ठेची झाली आहे. पुण्यातील उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्याच्या पार्श्वभूमीवर आज गुरुवारी महायुती आणि महाविकास आघाडीनेही जोरदार प्रदर्शन केलं. यामुळे पुण्यात राजकीय वातावरण तापलंय. याचदम्यान, महाविकास आघाडीकडून आयोजित सभेत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे भरसभेत विरोधकांवर जोरदार कडाडल्या. सुषमा अंधारे यांनी भरसभेत वाघांची गोष्ट सांगत विरोधकांवर निशाणा साधला.

पुण्यात आज महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, रविंद्र धंगेकर यांनी अर्ज दाखल केला. या तिन्ही उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर महाविकास आघाडीने आयोजित केलेल्या सभेत सुषमा अंधारेंनी उपस्थितांना संबोधित केले. 'झगडा शेर के बचडो के बीच का है, कुतो का यहा काम नही, शेर कुत्तो का फायदा नहीं होणे देंगे, अशी गोष्ट सांगत सुषमा अंधारे यांनी महायुती आणि अजित पवारांवर टीका केली.

सुषमा अंधारे काय कोणती गोष्ट सांगितली?

एका कुटुंब होतं. एका कुटुंबात दोन वाघ होते. वाघांचे दोन बछडे होते. बछडे एकमेकांसोबत प्रेमाने राहायचे. तसेच ते एकत्र खेळायचे आणि राहायचे. नाष्टा, खाणं एकत्र करायचे. शाळेत, शिकवणीला एकत्र जायचे.. काही दिवसांनी कळते झाले. काही दिवसांनी दोन बछड्यांमध्ये भांडण झालं. बघता बघता भांडण टोकाला गेलं की, वैरात रुपांतर झालं. दुश्मनी वाढत गेली.

एक 'अ' नावाचा होता, दुसरा ब नावाचा होता. अ नावाचा वाघ दुसऱ्यांना नेहमी 'ब'ने त्रास दिल्याचं सांगायचं. त्याच्याविरोधात नेहमी तक्रार करायचा. यामुळे 'अ'च्या बछड्यांमध्ये 'ब' विषयी द्वेष निर्माण झाला. एकेदिवशी 'अ' आपल्या लेकरांना शिकार शिकवायला गेला. त्याने 'ब'कडून शिकार शिकल्याचे सांगितले. दोघे बापलेक निघाले, त्यावेळी अ समोर आला. अ भरपूर थकलेला होता. त्यानंतर लेकाने 'अ'कडे बोट दाखवलं.

बघता बघता एक कुत्र्याचं टोळक 'अ'कडे आले. 'अ' हा शहाणा वाघ होता. कुत्र्याची झुंड आली, त्यानंतर 'अ'ने या कुत्र्यांवर झडप घातली. त्यानंतर सर्व कुत्र्यांचा खात्मा केला. त्यानंतर ऐटीत बसला. 'अ'ने त्याच्या लेकराला सांगितले, भांडण दोन वाघांमधील आहे, कुत्र्यांचा फायदा झाला नाही पाहिजे.

Sushma Andhare :
Madha Loksabha: माढ्यात नवा ट्वीस्ट! 'शेकाप'मध्ये फूट पडण्याची शक्यता; अनिकेत देशमुख अपक्ष अर्ज भरणार?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com