मनोज जरांगेंनंतर आता 'या' नेत्याची मैदानात उडी! १ सप्टेंबरला 'चलो मुंबई'ची घोषणा, राज्य सरकारची डोकेदुखी वाढणार

Manoj Jarange Patil, Laxman Hake : मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी १ सप्टेंबरला ‘चलो मुंबई’ची घोषणा केली आहे. ओबीसी आरक्षण आणि संविधानाच्या रक्षणासाठी मोठ्या संख्येने मुंबईत येण्याचे आवाहन त्यांनी समाजबांधवांना केले आहे.
Manoj Jarange Patil, Laxman Hake
Manoj Jarange Patil, Laxman HakeSaam TV
Published On

Manoj Jarange Patil latest news : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन करणार असल्याचा सरकारला इशारा दिला. त्यानंतर ओबीसीसाठी लक्ष्मण हाके यांनीही आंदोलनाची हाक दिली आहे. लक्ष्मण हाके यांनी जरांगेंवर टीका करत १ सप्टेंबर रोजी चलो मुंबईचा नारा दिला आहे. जरांगे आणि हाके हे दोन्ही नेते एकाचवेळी मुंबईत आंदोलनाला येणार असल्याने राज्य सरकार अडचणीत आले आहे. सरकारकडून आता काय पावले उचलली जातात, याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

आम्ही आरक्षणाच्या चौकटीतील सर्व समाजबांधवांना आवाहन करत आहोत. आरक्षण आणि संविधानाचे रक्षण करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व ओबीसी संघटनांनी १ सप्टेंबर रोजी मोठ्या संख्येने मुंबईत यावे, असे थेट आवाहन ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केले आहे.

Manoj Jarange Patil, Laxman Hake
विमानतळावर अचानक झाला गोळीबार; शिंदेंसेनेच्या नेत्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, राजकारणात खळबळ

मनोज जरांगे पाटील यांनी जी भूमिका घेतली आहे, ती जरांगे यांना स्वतःला तरी मान्य आहे का? जर हा प्रस्थापित समाज ओबीसी आरक्षणात आला, तर आधीच मागास असलेला ओबीसी समाज टिकेल का? तो या शासनकर्त्या वर्गाशी स्पर्धा करू शकेल का? याने सामाजिक न्याय होईल का? याचे उत्तर अभिजीत दीपके यांनी मनोज जरांगे यांना विचारले पाहिजे, असा घणाघाती सवाल हाके यांनी केला.

Manoj Jarange Patil, Laxman Hake
पावसाचा हाहाकार! महाराष्ट्र्रासह अनेक राज्यांमध्ये सोमवारी मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाने दिला इशारा

ओबीसी समाज आज संकटात आहे आणि एससी-एसटी समाजाला अडचणीत आणण्याचे षड्यंत्र या देशात अन् राज्यात सुरू आहे. मुक्या-बधिरांचे सोंग घेतलेल्या या सरकारला जाब विचारण्यासाठीच आम्ही १ सप्टेंबरला मुंबईच्या दिशेने कूच करत आहोत, असे हाके म्हणाले. मराठवाड्यासह सह इतर सर्व भागांतील ओबीसी बांधव दौंड तालुक्यातील पाटस टोलनाक्यावर एकत्र येणार आहेत. तेथूनच मुंबईच्या दिशेने ऐतिहासिक रॅलीचा प्रारंभ होईल, अशी माहिती त्यांनी दिली.

Manoj Jarange Patil, Laxman Hake
मुंबईत थेट बेडरूममध्येच सुरू होती हायटेक गांजाची शेती! YouTube वरून शिकला अन्...

आमच्या आरक्षणाच्या मुळावर जर कोणी येत असेल, तर त्याला आमचा तीव्र विरोध असेल. वतनदारांनी, जहागीरदारांनी, स्वतःला संस्थांनिक म्हणवणाऱ्यांनी आणि वेगवेगळ्या राजघराण्यांशी रक्ताचे नाते सांगणाऱ्यांनी आमच्या ओबीसींचे आरक्षण मारण्याचा प्रयत्न केला आहे. या 'जातचोरांना' जाब विचारण्यासाठीच आम्ही १ सप्टेंबरला मुंबईला जात आहोत, असेही हाके म्हणाले.

Manoj Jarange Patil, Laxman Hake
एलपीजीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय! इतिहासात पहिल्यांदाच कंपन्यांना दिले 'हे' आदेश; सर्वसामान्यांवर काय परिणाम?

जरांगे पाटील आणि आरक्षण तज्ज्ञांवर टीका

आरक्षणाच्या मुद्द्यावरून बोलताना हाके म्हणाले, कोणीही सुप्रीम कोर्टापेक्षा मोठे तज्ज्ञ असू शकत नाही. सुप्रीम कोर्टाचे साडेसहाशे पानांचे जजमेंट आहे, ज्यामध्ये न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचे स्पष्ट जजमेंट आहे. ईडब्ल्यूएस (EWS) आरक्षण हे कोणासाठी आहे, हे सर्वांना माहीत आहे.

अभिजीत दीपके यांच्या आंदोलनावर बोलताना हाके म्हणाले, अभिजीत दीपके तुम्ही आंदोलन करत आहात, आम्ही तुमचे स्वागतच करतो. तुमच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा होता. परंतु जर कोणी आरक्षणाच्या आणि संविधानाच्या आड येत असेल, तर ते खपवून घेतले जाणार नाही. अभिजीत हा नवीन मुलगा आहे. आम्ही आरक्षण, संविधान वाचवण्यासाठी तसेच दीनदलित आणि भटके-विमुक्त समाजाच्या हक्कांची लढाई लढत आहोत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com