Akola Crime : माझ्या मैत्रिणीला का बघतोय? तरुण संतापला; भर रस्त्यात नको ते करून बसला

Akola Crime news : अकोल्यात 22 वर्षीय तरूणाची चाकूने भोकसून हत्या करण्यात आली आहे. मैत्रिणीला का बघतोय? कारणावरून हत्याकांड घडलं आहे. तिघांवर चाकू हल्ला झाला होता. या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
Akola Crime News
Akola Crime Saam tv
Published On

अक्षय गवळी, साम टीव्ही

Akola Crime : अकोला शहरातील जेतवन नगरात 22 वर्षीय तरुणाची हत्या झाल्याची घटना घडली आहे. तर या हल्ल्यात दोघे जण जखमी झाले आहेत. दोन आरोपींनी चाकूने भोसकून तरुणाची हत्या केली. प्रेमप्रकरणातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.. तरुणासोबत त्याचा एक मित्रही हल्ल्यात गंभीर जखमी झाला. दोघांवर अकोला जिल्हा रूग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यान २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.

Akola Crime News
बापरे! बस चालवताना IPL मॅच बघणे पडले महागात; ST महामंडळाने चालकाला नोकरीवरून काढलं

करण चितळे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. ऐन संध्याकाळच्या सुमारास हत्येच्या घटनेने खदान परिसर हादरला. मारेकरी हे करण चितळे याचेच मित्र असल्याचे समजते. प्रेम प्रकरणातून करणसह त्याच्या 2 मित्रावर चाकूने वार केले होते. जवळपास या हल्ल्यात तीन जण जखमी झाले होते. मात्र, उपचारादरम्यान करण चितळे याचा मृत्यू झाला.

Akola Crime News
Horrific Accident : मुलगी पाहण्याचा कार्यक्रमाला गेले, पुन्हा परतलेच नाही; भीषण अपघातात ३ तरुणांचा जागीच मृत्यू

घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अकोला शहरातील जेतवन नगर भागात घटना घडली होती. खदान पोलीस अधिक तपास या प्रकरणात करत आहेत. पोलिसांनी २ संशयितांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.

Akola Crime News
Ishan kishan : हलक्यात घेऊ नका! मुंबईने सोडलं, हैदराबादने उचललं; ४५ बॉलमध्ये शतक ठोकत ईशानने राजस्थानला फोडलं

दरम्यान, माझ्या मैत्रिणीला का बघतोय? यावरून करण चितळे याची हत्या झाल्याचे बोलल्या जात आहे. करण चितळेची हत्या झाल्यानंतर त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. करण चितळेच्या मृत्यूनंतर खदान परिसरावर शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com