बापरे! बस चालवताना IPL मॅच बघणे पडले महागात; ST महामंडळाने चालकाला नोकरीवरून काढलं

IPL Match : बस चालवताना IPL मॅच बघणे चालकाला महागात पडले आहे. ST महामंडळाने चालकाला नोकरीवरून काढलं आहे.
IPL News
IPL Saam tv
Published On

एसटी महामंडळाच्या चालकाला बस चालवताना क्रिकेट मॅच पाहणे महागात पडले आहे. बस चालवताना मोबाईलवर मॅच बघितल्याने चालकाला नोकरी गमवावी लागली आहे. मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालकावर कारवाईचे आदेश दिले. एका प्रवाशाने चालकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर मंत्री सरनाईक यांनी कारवाई केली.

IPL News
Horrific Accident : मुलगी पाहण्याचा कार्यक्रमाला गेले, पुन्हा परतलेच नाही; भीषण अपघातात ३ तरुणांचा जागीच मृत्यू

एसटी महामंडळाचा चालक २२ मार्च रोजी मुंबई-पुणे महामार्गावर ई-शिवनेरी बस चालवत होता. त्यावेळी चालक मोबईलवर क्रिकेट मॅच पाहत होता. त्याचवेळी बसमधील एका प्रवाशाने चालकाचा प्रकार कॅमेऱ्यात कैद केला. त्यानंतर हा व्हिडिओ मंत्री प्रताप सरनाईक यांना पाठवला. त्यानंतर मंत्री सरनाईक यांनी कारवाईचे आदेश दिले.

IPL News
Unemployment Engineer : ८३ टक्के इंजिनीअर बेरोजगार; धक्कादायक कारण आलं समोर

प्रवाशाने बस चालकाचा व्हिडिओ सोशल मीडियावरही पोस्ट केला. प्रवाशाने हा व्हिडिओ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही टॅग केलं. त्यानंतर सरनाईक यांनी एमएसआरटीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कारवाईचे निर्देश दिले. तसेच दंडही ठोठावला.

मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं की, 'ई-शिवनेरी मुंबई-पुणे मार्गावरील प्रमुख सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे. ई-शिवनेरीमधून दररोज अनेक प्रवासी प्रवास करतात. ई-शिवनेरीने प्रवास अपघात टाळण्यासाठी केला जातो. बस चालवताना निष्काळजीपणा करणाऱ्या चालकावर कारवाई केली जाणार आहे. त्याने प्रवाशांना जीव धोक्यात घातला.

IPL News
Satyamev Jayate Farmer Cup : 'आम्हाला थोडी भीती वाटते, कारण...'; आमिर खान स्पष्टच बोलला

दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या गांदरबल जिल्ह्यात श्रीनगर-सोनमर्ग मार्गावर रविवारी बस आणि टॅक्सीची धडक झाली. या अपघातात ४ लोकांचा मृत्यू झाला. तर १७ लोक जखमी झाले. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, बसचा अपघात हा गुंड भागात झाला आहे. या अपघातात दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला आहे. तर लेशिया आशीष, नक्की आशिष, हेतल आशीष यांचा मृत्यू झाला आहे. सर्व मृत लोक महाराष्ट्राचे रहिवासी आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com