Satyamev Jayate Farmer Cup : 'आम्हाला थोडी भीती वाटते, कारण...'; आमिर खान स्पष्टच बोलला

aamir khan on Satyamev Jayate Farmer Cup : सत्यमेव जयते फार्मर कप पुरस्कार सोहळ्यात आमिर खानने मोठं भाष्य केलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचाही उल्लेख केला.
aamir khan News
aamir khanSaam tv
Published On

पुणे : पुण्यातील सत्यमेव जयते फार्मर कप पुरस्कार सोहळ्यात आमिर खानने शेतकरी आणि पाणीपुरवठ्यावर भाष्य केलं. 'देवेंद्रजी प्रत्येक वर्षी मला एक गोष्ट विचारतात की, तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रात तुम्ही कधी जाणार आहात? पण आम्हाला थोडी भीती वाटते. कारण ही जबाबदारी खूप मोठी आहे. आपला महाराष्ट्र जर्मनीपेक्षा खूप मोठा आहे म्हणून भीती वाटते की, राज्यभर आपण पाणी फाउंडेशनच काम घेऊन जाऊ शकतो का? असा सवाल आमिर खानने केला.

aamir khan News
Prashant koratkar : चिल्लर कोरटकर दुबईला पळाला? नागपूर पोलिसांचं वरातीमागून घोडं? पाहा स्पेशल रिपोर्ट

पुण्यात आज सत्यमेव जयते फार्मर कप पुरस्कार सोहळ्याचं आयोजित करण्यात आलं आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हजेरी लावली. अभिनेते आमिर खानकडून दरवर्षी पाणी फाउंडेशन वतीने पुरस्कार दिला जातो. राज्यभरातील शेतकरी,गावकरी यांनी स्पर्धेच्या पुरस्कार वितरण सोहळ्याला हजेरी लावली आहे.

aamir khan News
Iceland Minister : तरुणाशी अनैतिक संबंध, मुलाला दिला जन्म; महिला मंत्रीचं पदही गेलं

आमिर खान म्हणाला, 'आम्ही 3 वर्षांपूर्वी एक स्वप्न घेऊन पुढे आलो होतो. ते स्वप्न शेतकऱ्यांसाठी होतं. शेतकऱ्यांसाठी काय करू शकतो, पीक कसे वाढवता येईल हे सगळे मुद्दे घेऊन समोर आलो होतो. आम्ही गट शेती करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही सगळ्यांनी खूप काम केलं'.

aamir khan News
Pune Crime : पुण्यात 'कोयता गँग'नंतर आणखी एका टोळीचा धुमाकूळ; शहरातील 10 लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला, नागरिकांमध्ये दहशत

'देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार मानतो की, ते आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिल्याने आम्ही दरवर्षी यशस्वी होत गेलो. देवेंद्र फडणवीसांची टीम, आमच्या सोबत आणि शेतकऱ्यांसोबत राहिली. आम्ही आता पाणी फाउंडेशनचे काम राज्यभर करणार आहोत. आम्ही पुढच्या वर्षापासून पूर्ण महाराष्ट्रात हे काम करू, असा निश्चय आमिर खानने व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com