Prashant koratkar : चिल्लर कोरटकर दुबईला पळाला? नागपूर पोलिसांचं वरातीमागून घोडं? पाहा स्पेशल रिपोर्ट

prashant koratkar Latest news : छत्रपती शिवरायांचा अवमान कऱणाऱ्या भित्र्या प्रशांत कोरटकरने दुबईला पळ काढल्याची चर्चा रंगलीय.. त्याचे राजकीय पडसाद उमटलेत.. मात्र खरंच कोरटकर दुबईला पळाला आहे का? पाहूयातया स्पेशल रिपोर्टमधून.....
Koratkar News
Koratkar NewsSaam
Published On

छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारा चिल्लर प्रशांत कोरटकर 26 दिवसानंतरही फरार आहे.. त्यातच आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय.. नागपूर दंगलीचा आधार घेऊन प्रशांत कोरटकर कोलकत्तामार्गे दुबईला पळाल्याची चर्चा रंगलीय.. त्याला कारण ठरलंय त्याचा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो....

हा फोटो पाहा....यात कोरटकरच्या मागे अरेबिक भाषेत लिहीलेला बोर्ड दिसतोय.. तर प्रशांत कोरटकरच्या शेजारी उभ्या असलेल्या गाडीची नंबर प्लेटही अरबी भाषेत दिसत आहे.. त्यामुळे याच मुद्द्यावरुन संजय राऊतांनी गृहखात्यावर निशाणा साधलाय...तर सत्ताधारी अजित पवारांच्या राष्ट्रवादीने नागपूर पोलीसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय. गृहखात्याच्या मदतीशिवाय कोरटकर दुबईला जाऊच शकत नाही, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

कोरटकर दुबईला पळाला असेल तर नागपूर पोलिसांचं अपयश, असं आमदार अमोल मिटकरी म्हणाले. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कोरटकरच्या मुसक्या आवळण्याचा इशारा दिलाय..

प्रशांत कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्यानंतर आतापर्यंत नेमकं काय घडलं? पाहूयात...

25 फेब्रुवारी

प्रशांत कोरटकरचं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपमानकारक वक्तव्य

धमक्यांमुळे प्रशांत कोरटकरला पोलीस संरक्षण

कोल्हापूरमध्ये कोरटकरविरोधात गुन्हा दाखल

पोलीस संरक्षण असताना कोरटकर फरार

कोरटकरचा मोबाईल पत्नीमार्फत पोलीसांकडे

18 मार्च

कोरटकरचा जामीन सत्र न्यायालयाने फेटाळला

कोर्टाने जामीन फेटाळल्यानंतर कोरटकर पोलिसांना सापडत नाही.. त्यामुळे पोलिसच कोरटकरला वाचवत आहेत का? पोलीस संरक्षण असताना कोरटकर पळाला कसा? कोरटकर आपला मोबाईल पत्नीमार्फत पोलिसांपर्यंत कसा पोहचवतो? कोरटकर दुबईला पळाला असल्यास पोलीस झोपी गेले होते का? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झालेत....त्यामुळे शिवद्रोही कोरटकरच्या मुसक्या आवळून पोलीस खात्यावरील डाग कधी धुतला जाणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com