Iceland Minister : तरुणाशी अनैतिक संबंध, मुलाला दिला जन्म; महिला मंत्रीचं पदही गेलं

Iceland Minister News : तरुणाशी अनैतिक संबंध ठेवल्यानंतर मुलाला जन्म दिला. ही कबुली दिल्यानंतर महिला मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला आहे .
Iceland Minister News
Iceland Minister Saam tv
Published On

आईसलंडच्या मंत्री आस्थिल्दूर लोआ थोरसडॉटिर यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. तरुणाशी अनैतिक संबंध ठेवल्याने आयसलंडच्या मंत्र्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. महिला मंत्र्यांनी तरुणाचं वय १५ असताना त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवले होते. तरुण १६ वर्षांचा झाल्यानंतर मंत्री गरोदर झाली. मंत्र्याने एका मुलालाही जन्म दिला.

Iceland Minister News
Beed News : बीड पोलिसांकडून कारवाईचा धडाका; जिल्ह्यातील आणखी एका गुंडाच्या मुसक्या आवळ्या, गावगुंडही दणाणले

३६ वर्षांपूर्वीची ही घटना आहे. मंत्री आस्थिल्दूर लोआ थोरसडॉटिर या २२ वर्षांच्या असताना एका तरुणाशी शारीरिक संबंध ठेवले होते. आस्थिल्दूर यांनी २३ वर्षांपूर्वी एका मुलाला जन्म दिला होता. या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा मंत्री आस्थिल्दूर यांनी दिला. त्यानंतर मंत्री आस्थिल्दूर यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.

Iceland Minister News
Nagpur : मोठी बातमी! नागपुरातील संचारबदी पूर्ण हटवली, पण...'; पोलिसांनी एक अट ठेवली कायम

मीडिया रिपोर्टनुसार, मंत्री आस्थिल्दूर यांचे एरिकूर नावाच्या तरुणाशी अनैतिक संबंध होते. एरिकूरने त्याचा मुलाला भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र, आस्थिल्दूर यांनी मुलाला भेटण्यास नकार दिला. मंत्री आस्थिल्दूर या मुलाला जन्म देताना एरिकूर रुग्णालयात उपस्थित होता. मंत्री आस्थिल्दूर आणि एरिकूरच्या नात्यात कटुता आली. दोघांनी एकमेकांंशी बोलणे सोडून दिले.

Iceland Minister News
Horrific Incident : महाराष्ट्र हादरला; ८० वर्षांच्या म्हाताऱ्याकडून ३ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार

मंत्री आस्थिल्दूर यांनी एरिकूरचे आरोप फेटाळून लावले आहेत. मंत्री आस्थिल्दूर पुढे म्हणाल्या, 'आता मी आधीसारखी राहिली नाही. मी आता गोष्टी वेगळ्या दृष्टीकोनातून पाहते. आधीच वेळ असती तर मी वेगळ्या पद्धतीने परिस्थिती हाताळली असती. पण आता बराच वेळ निघून गेला आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com