Nagpur : मोठी बातमी! नागपुरातील संचारबदी पूर्ण हटवली, पण...'; पोलिसांनी एक अट ठेवली कायम

Nagpur Latest News : नागपुरातील संचारबदी पूर्ण हटवली आहे. नागपुरातील ५ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील संचारबंदी हटवण्यात आली आहे. मात्र, पोलिसांनी एक अट कायम ठेवली आहे.
nagpur city
nagpur News Saam tv
Published On

पराग ढोबळे, साम टीव्ही

नागपुरातील राड्यानंतर आता पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. नागपूरच्या ५ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संचारबंदी पूर्णत: हटविण्यात आली आहे. नागपूरच्या पाचपावली, शांतीनगर, लकडगंज, सक्करदारा, इमामवाडा या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संचारबंदी पूर्णत: हटवण्यात आली आहे. नागपूर पोलिसांच्या निर्णयानंतर नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

nagpur city
Horrific Incident : महाराष्ट्र हादरला; ८० वर्षांच्या म्हाताऱ्याकडून ३ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार

नागपुरात हिंसाचार घडल्यानंतर ५ पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी लावण्यात आली होती. नागपुरातील परिस्थिती निवळली आहे. त्यानंतर पोलिसांकडून निर्बंध मागे घेण्यास सुरुवात केली आहे. नागपुरातील पाचपावली, शांतीनगर, लकडगंज, सक्करदरा, इमामवाडा या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील संचारबंदी पूर्णतः हटवण्यात आली आहे.

nagpur city
Nagpur Violence : चुकीला माफी नाहीच! दंगलखोरांना सोडणार नाही, बुलडोझर फिरवणार, CM फडणवीसांचा कडक इशारा

गणेशपेठ, तहसील, कोतवाली या तीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंशत: संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सायंकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत शिथिलता देण्यात आली आहे. नागपुरात रात्री १० नंतर या हद्दीत संचारबंदी कायम असेल. यशोधरानगर संचारबंदी देखील कायम असणार आहे. नागपूर पोलिस आयुक्तांनी हे निर्देश काढले आहेत.

परभणीत औरंगजेबाच्या कबरीवरून वादग्रस्त पोस्ट; पोलिसांकडून ५७ जणांना नोटीस

राज्यभर सध्या औरंगजेबच्या कबरीवरून वादंग उठले उरले आहे. त्याचा सोशल मीडियावर परिणाम दिसत आहे. यावरून परभणी जिल्ह्यातील सायबर पोलीस स्टेशन सर्व पोलीस स्टेशनमध्ये सोशल मीडिया मॉनिटर शेअरची स्थापना केली गेली आहे. याच अनुषंगाने आज परभणी पोलीस अधीक्षकांनी विविध धार्मिक राजकीय मुद्द्यांवरून सोशल मीडियावर केलेल्या वादग्रस्त पोस्ट आणि कमेंट करणाऱ्यांना पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलून तंबी देण्यात आली आहे.

सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट करणाऱ्यांवर 4 गुन्हे दाखल केले आहेत. तर २१ जणांवर प्रतिबंधक कारवाई केली गेली आहेत. तसेच ५७ जणांना नोटीस दिली आहे. सोशल मीडियावर कोणतेही वादग्रस्त पोस्ट करू नये, असे पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांच्याकडून आव्हानही केले जात आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com