Nagpur Riots: परत-परत नको ते प्रश्न काढून समाजात तेढ निर्माण करू नका; अजित पवारांचा राणेंना इशारा

Deputy CM Ajit Pawar On Nagpur Violence: जो कोणी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करेल. कायदा सुव्यवस्था बिघडवेल, त्या नेत्यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याचं अजित पवार म्हणालेत.
Ajit Pawar
Deputy CM Ajit Pawar On Nagpur ViolenceSaam Tv
Published On

छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती-धर्मांना एकत्र घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. सर्व महापुरुषांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला. आज आपल्यापुढे वेगळे प्रश्न आहेत. त्यामुळे परत परत तेच मुद्दे काढू नका, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाजप नेते नितेश राणेंना अप्रत्यक्षपणे इशारा दिलाय.

अजित पवार पुण्यात माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी औरंगजेबच्या कबरीवरून सुरू असलेल्या वादावरून नेत्यांना सुनावलं. औरंगजेबच्या कबरीबाबत आपण आधीच भूमिका स्पष्ट केलीय. त्यामुळे परत-परत मुद्दे काढू नका, असं अजित पवार म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती-धर्मांना एकत्र घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराजांसह सर्व महापुरुषांनी समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. आज आपल्यापुढे वेगळे प्रश्न आहेत. अशावेळी नको ते प्रश्न काढून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम कोणीच करू नये, असा सल्ला अजित पवारांनी महायुतीच्या नेत्यांना दिला.

Ajit Pawar
Koratkar News: प्रशांत कोरटकर दुबईला जाण्यामध्ये मंत्रालय कनेक्शन? राष्ट्रवादीच्या आमदाराला मात्र वेगळाच संशय

मुख्यमंत्री फडणवीसांकडे तक्रार करणार

गेल्या काही दिवसांपासून राज्यात औरंगजेबच्या कबरीवरून वाद निर्माण झालाय. छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबची कबर काढून टाकण्यात यावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि काही राजकीय नेत्यांनी केली होती. कबरीच्या वादावरून नागपूरमध्ये दंगल उसळली होती. त्यानंतर भाजपचे नेते मंत्री नितेश राणे यांनी वादग्रस्त विधान केली होती. राणेंच्या भडकाऊ विधानांवरून मुख्यमंत्र्यांनी त्यांना तंबी दिली होती.

Ajit Pawar
Nagpur Riots: दंगलीमध्ये सहभागी असलेल्यांची प्रापर्टी जप्त होणार; मुख्यमंत्री फडणवीस अ‍ॅक्शन मोडवर

आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राणेंना इशारा दिलाय. नको ते विषय काढून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम कोणीच करू नये. कायदा सुव्यवस्था सांभाळण्याचे काम सर्वांचेच आहे. माझ्यासहित सर्वांनी हे केलं पाहिजे. माझ्या मंत्र्यांनी केलं तर मी त्यांना सांगेन पण दुसऱ्या मंत्र्यांनी बोललो तर फडणवीस आणि शिंदेंच्या कानावर घालेन असा इशारा अजित पवार यांनी दिलाय.

Ajit Pawar
Nagpur Violence : मोठी बातमी! नागपूर हिंसाचाराचा पहिला बळी; रेल्वे स्टेशनकडे जाताना जमावाच्या मारहाणीत जखमी, उपचारादरम्यान मृत्यू

मुस्लिम बांधवांना डोळा दाखवेल सोडले जाणार नाही

नागपुरात झालेल्या हिंसाचारानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मुस्लिम समाजाला सुरक्षेचे आश्वासन दिले. जो कोणी मुस्लिम बांधवांना डोळा दाखवेल तो दोन गटात संघर्ष करून कायदा आणि सुव्यवस्था बिघडवेल. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करेल. मग तो कोणीही असला तरी त्याला कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, त्याला माफ केले जाणार नाही, असा इशाराही अजित पवार यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलातांना दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com