
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षपार्ह वक्तव्य करणारा प्रशांत कोरटकर आता दुबईला पळून गेल्याची माहिती समोर आली आहे. कोलकाता आंतरराष्ट्रीय विमानतळावरून कोरटकर दुबईला गेला, अशी माहिती सुत्रांनी दिलीय.
कोरकटकरच्या फोटोवरून विरोधकांकडून आरोप प्रत्यारोप सुरू आहे. अशातच संभाजी ब्रिगेडचे संतोष देशमुख यांनी सरकारवर प्रश्नांची तोफ डागली. प्रशांत कोरटकर दुबईला पळून जाण्यामध्ये मंत्रालय कनेक्शन आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
मंत्र्यांच्या आशीर्वादाने कोरटकर दुबईत?
'शिवद्रोही प्रशांत कोरटकर कुणाच्या आशीर्वादाने दुबईला पळून गेला? तो का सापडत नाही? सत्ताधारी पक्षाच्या किंवा मंत्र्यांच्या आशीर्वादाने कोरटकर हॉटेलमध्ये लपून बसला होता का? असा सवाल देशमुख यांनी उपस्थित केला आहे. तसेच सगळे शिवद्रोही कोरटकरच्या पाठीशी उभे आहेत का? हा महाराष्ट्राचा अपमान आहे, असंही देशमुख म्हणाले आहेत.
...त्याला फरपटत महाराष्ट्रात
'गुन्हेगारांना सरकार पोलीस संरक्षण देऊन पळवून लावत आहेत. सरकार आणि पोलिसांवर काडीमात्र विश्वास राहिलेला नाही. डिजिटल युगातही आरोपी पोलिसांच्या तावडीत का सापडत नाही? तात्काळ कोरटकरच्या मुसक्या आवळाव्यात. त्याला फरपटत महाराष्ट्रात घेऊन यावं', अशी मागणीही देशमुख यांनी केली.
अमोल मिटकरी नागपूर पोलिसांवर कडाडले
प्रशांत कोरटकरचा दुबईतील फोटो समोर आल्यानंतर तो दुबईला पळून गेल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी नागपूर पोलिसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. नागपूर पोलिसांनीच प्रशांत कोरटकरला लपवलं आहे, असा गंभीर आरोप आमदार मिटकरी यांनी केला आहे.
कोरटकर जर दुबईला पळून गेला असेल तर, हे नागपूर पोलिसांचं अपयश आहे, असं मिटकरी म्हणाले आहेत. दरम्यान, कोरटकर चंद्रपुरात येऊन पोलीस अधिकाऱ्यांना कसा भेटतो? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.