Akola : प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात पोस्ट; वंचितच्या कार्यकर्त्यांकडून तरुणाला चोप, तेल्हारात तणाव

Akola News : राज्यात मागील दोन दिवसांपासून औरंगजेबच्या कबरीच्या मुद्यावरून वातावरण तापले आहे. याचे पडसाद उमटत आहेत. यातच अकोला जिल्ह्यातील तेल्हारा शहरात वादग्रस्त पोस्टमुळे तणाव निर्माण झाला
Akola News
Akola NewsSaam tv
Published On

अक्षय गवळी 

अकोला : औरंगजेबच्या कबरीवरून राज्यातील वातावरण सध्या तापले आहे, नागपुरात रात्री दंगल झाली होती. याच दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या संदर्भात इंस्टाग्रामवर पोस्ट टाकण्यात आली आहे. यामुळे वंचितच कार्यकर्ते आक्रमक होत पोस्ट टाकणाऱ्या तरुणाला चांगलाच चोप दिला. यामुळे अकोल्याच्या तेल्हारा शहरात काही काळ  तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

राज्यात मागील दोन दिवसांपासून औरंगजेबच्या कबरीच्या मुद्यावरून वातावरण तापले आहे. याचे पडसाद उमटत असल्याचे दिसून येत आहेत. यातच अकोला जिल्ह्यातील तेल्हारा शहरात वादग्रस्त पोस्टमुळे तणाव निर्माण झाला आहे. तेल्हारातील एका नागोलकार नामक तरुणाने प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती. सदरची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर वंचितचे आणि आंबेडकरांचे चाहते संतप्त झाले होते. 

Akola News
Crime : मंगळसूत्र चोरीच्या घटनेने तिच्या आयुष्याचं मंगळसूत्र हिरावलं; चोरट्यांचा पाठलाग करणे पतीच्या जीवावर बेतला

घरातून बाहेर काढत दिला चोप 

दरम्यान तेल्हारा शहरात जमा होत पोस्ट करणाऱ्या तरुणाला घरातून बाहेर काढत चांगलाच चोप दिला. तसेच तेल्हारा शहरात त्याची धिंड काढण्याचाही प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला. यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ऐनवेळी तेल्हारा पोलिसांनी मध्यस्थी करत पोस्ट करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतले आहे. यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. मात्र कार्यकर्त्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. 

Akola News
Latur News : महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयाला घातला दारूच्या बाटल्याचा हार; दारूविक्री विरोधात महिला आक्रमक

पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त 
यादरम्यान आंबेडकर यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत तेल्हारा पोलीस स्टेशन गाठलं. तक्रार नोंदवण्यासाठी दाखल झाले आहेत. या प्रकरणात पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू असून सद्यस्थितीत तणावपूर्ण शांतता आहे. कुणीही कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये; असे आवाहन अकोला पोलिसांनी केले. सद्यस्थितीत तेल्हारा शहरात मुख्य चौकात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com