Lok Sabha Election 2024 : इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं; सोनिया, राहुल गांधींचं मतदान काँग्रेसला नाहीच!

Rahul Gandhi Sonia Gandhi Vote: आज दिल्लीत गांधी कुटुंबाने आप पक्षाला मतदान केलं आहे. राहुल गांधींनी मतदान केल्यानंतर X अकाउंटवर पोस्ट करत सर्वांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.
राहुल गांधी आणि सोनिया गांधी
Rahul Gandhi Sonia Gandhi VoteSaam Tv

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात आज दिल्लीत सात लोकसभा जागांसाठी मतदान होत आहे. यावेळची निवडणूक काँग्रेस आणि गांधी कुटुंबासाठी खूप खास असल्याचं बोललं जात आहे. कारण आज पहिल्यांदाच गांधी कुटुंबाने कॉंग्रेस सोडून 'आप'ला मतदान केलं आहे. सार्वत्रिक निवडणुकीत गांधी परिवाराने काँग्रेस पक्षाला मतदान न करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

सोनिया गांधी, प्रियंका गांधी आणि राहुल गांधी हे दिल्लीचे मतदार आहेत. गेल्या अनेक निवडणुकांत काँग्रेसने या जागेवर (Delhi Lok Sabha) आपला उमेदवार उभा केला होता. मात्र यंदा तसं नाहीये. यावर्षी आम आदमी पार्टी, काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे मित्रपक्ष दिल्लीत एकत्र निवडणूक लढवत आहेत. आप आणि काँग्रेसने भाजपविरोधात संयुक्त उमेदवार उभे केले आहेत, अशी दिल्लीतील ही पहिलीच लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) आहे.

दिल्लीत जागावाटप पद्धतीनुसार आप चार तर काँग्रेस तीन जागांवर निवडणूक लढवत आहे. त्याअंतर्गत नवी दिल्लीतील जागा आपकडे आहे. या जागेवरून आम आदमी पक्षाने सोमनाथ भारती यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे काँग्रेसने नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून त्यांचा उमेदवार (AAP Candiadate Somnath Bharti) उभा केलेला नाही. त्यामुळे गांधी परिवार आज आप पक्षाचे उमेदवार सोमनाथ भारती यांना मतदान केलं आहे.

राहुल गांधी आणि सोनिया गांधी
Lok Sabha Election 2024: दिल्लीत वातावरण तापलं; मतदानाच्या धामधुमीत 'आप'चे उपराज्यपालांवर गंभीर आरोप

तुमचं मत तुमचं जीवन तर सुधारेलच पण लोकशाही आणि संविधानाचे रक्षण करेल. लोकशाहीच्या या महान उत्सवात आई आणि मी (Rahul Gandhi Sonia Gandhi Vote) मतदान करून हातभार लावला आहे. तुम्ही सर्वांनीही मोठ्या संख्येने घराबाहेर पडा, तुमच्या हक्कासाठी आणि तुमच्या कुटुंबाच्या भविष्यासाठी मतदान करा, अशी राहुल गांधी यांनी मतदान केल्यानंतर त्यांच्या अधिकृत X अकाउंटवर पोस्ट केली आहे. त्यांनी सर्वांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.

राहुल गांधी आणि सोनिया गांधी
Lok Sabha Election Voting Live : ४०० पार जागा नव्हे, पेट्रोलच्या किंमतींबद्दल बोलताहेत, कन्हैया कुमार यांचा भाजपला टोला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com