Lok Sabha Election Voting Live : महाराष्ट्र - मध्य प्रदेश सीमेवर वादळाचा कहर

Lok Sabha Election 2024 Six Phase Voting Live : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ८ राज्यांतील ५८ जागांसाठी मतदान होणार आहे. सर्व मतदान केंद्रांवर मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे.
Maharashtra Election 2024 Voting 2024 Live: लोकसभा निवडणूक मतदान पाचव्या टप्प्यातील मतदानाचे लाईव्ह अपडेट
lok sabha election 2024 six phase voting Live Update in MarathiSaam TV
Published On

महाराष्ट्र - मध्य प्रदेश सीमेवर वादळाचा कहर

जळगाव जिल्ह्यातील महाराष्ट्र - मध्य प्रदेश सीमेवर तुफानी वादळाचा कहर

मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर तर जळगाव जिल्ह्यातील रावेर सह मुक्ताईनगर भुसावळ जळगाव परिसरात वादळाचा बटका

वादळामुळे केळीच्या बागा फटका बसण्याची शक्यता

वादळामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाल्याचा अंदाज वर्तुळ आहे

जळगाव शहरांतही विजयाच्या कळकळासह वादळ सुरू

अकोला जिल्ह्यातील बोरगावमंजू येथील जैन हार्डवेअर दुकानाला मोठी आग

अकोला जिल्ह्यातील बोरगावमंजू येथील जैन हार्डवेअर दुकानाला मोठी आग लागली आहे. सव्वा 8 वाजताच्या सुमारास ही आग लागली आहे. हार्डवेअरला लागूनच सॉ मिल आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्थानिक नागरिकांचे प्रयत्न सुरू आहेत मात्र आग भीषण आहे. घटनास्थळी अकोला महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे बंब दाखल झाले. आगीचे कारण अद्यापपर्यरत अस्पष्ट आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी असा अंदाज घटनास्थळी वर्तवला जात आहे. अकोल्यातल्या बोरगाव मंजू इथे जैन हार्डवेअरला ही भीषण आग लागली आहे. या आगीत दुकानातील मोठ्या प्रमाणात सामान जळून ख़ाक झालेत.

राजकोटमधील भीषण आगीत २० जणांचा होरपळून मृत्यू

गुजरातच्या राजकोटमधील मॉलला लागलेल्या आगीतील मृतांचा आकडा वाढला

TRP मॉलच्या गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

मृतांमध्ये 12 लहान मुलांचा समावेश

जखमींना रुग्णालयात केलं दाखल

आगीच कारण अद्याप अस्पष्ट

गुजरात पोलिसांनी गेमिंग झोनच्या मालकाला केली अटक

देशभरात सहाव्या टप्प्यासाठी 59.16% मतदान

राज्यनिहाय मतदानाची आकडेवारी -

बिहार - 53.60%

हरियाणा - 58.44%

जम्मू आणि काश्मीर - 52.28%

झारखंड - 62.87%

नवी दिल्ली - 54.80%

ओडिसा - 60.07%

उत्तर प्रदेश- 54.03%

पश्चिम बंगाल - 78.19%

लोकसभा निकालानंतर कीर्तिकर यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता

गजानन कीर्तिकर यांनी स्वतःचा मुलगा निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे शिंदे गटाच्या उमेदवाराचे काम केले नसल्याची तक्रार अनेक स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. गजानन कीर्तिकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान केलेली वक्तव्य यामुळे देखील मुख्यमंत्री नाराज असल्याची चर्चा आहे.

बुलढाण्यात रेती माफियांकडून तहसीलदारांवर पाठलाग करून हल्ला करण्याचा प्रयत्न

मेहकर तहसीलदार निलेश मडके यांच्यावर रेती माफियांच्या पथकाचा हल्ला करण्याचा प्रयत्न.

तहसीलदार निलेश मडके यांचा पाठलाग करून हल्ला करण्याचा प्रयत्न.

तहसीलदार निलेश मडके बालंबाल बचावले.

मेहकर पोलिसात तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.

भा.द.वी. 341 , 186 , 34 नुसार तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल.

तिन्ही आरोपी फरार.

पुण्यातील प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न: संजय शिरसाठ

काही लोक याला गांभीर्याने घेण्याऐवजी राजकीय रंग देत आहेत

मस्तवाल मुलाने केलेला प्रकार आता अजून काही गोष्टी समोर येत आहेत

कोणालाही वाटत नाही कि त्या मुलाला सोडवावे...

हिरो बनण्याचा जो प्रकार आहे तो बाजूला ठेवा राजकारण दूर ठेवून काही पुरावे असतील तर ते द्या...

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व समुद्रकिनाऱ्यावरील जलपर्यंन उद्यापासून बंद

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच समुद्रकिनाऱ्यावर होणारे जलपर्यटन उद्या 26 मे पासून बंद होणार आहे. पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व प्रकारचे जलपर्यटन २६ मे ते ३१ ऑगस्ट या कालावधीत बंद ठेवण्याचे आदेश बंदर आणि पर्यटन विभागाने जारी केले आहेत. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी २६ मेपासून सागरी जलपर्यटन आणि सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना या बंदीमुळे हिरमोड होणार आहे.

देशभरात सायंकाळी 5 पर्यंत 57.7 टक्के मतदान, पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदानाची नोंद

राज्यनिहाय मतदानाची आकडेवारी -

बिहार - 52.24%

हरियाणा - 55.93%

जम्मू आणि काश्मीर - 51.35%

झारखंड - 61.41%

नवी दिल्ली - 53.73%

ओडिसा - 59.60%

उत्तर प्रदेश- 52.02%

पश्चिम बंगाल - 77.99%

निवडणूक आयोगाकडून पहिल्या 5 टप्प्यांची आकडेवारी जाहीर

फॉर्म 17 सी च्या द्वारे गोळा केलेली माहिती आयोगाकडून प्रसिद्ध

प्रत्येक मतदारसंघ निहाय (जिल्हा निहाय) आकडेवारी आयोगाने केली जाहीर

आकडेवारी जाहीर करत असताना काल सुप्रीम कोर्टाने आयोगाबाबत केलेल्या टिप्पणी बद्दल कोर्टाचे मानले आभार

सुप्रीम कोर्टाने काल यासंदर्भातील याचिकेत हस्तक्षेप करण्यास नकार दिल्यानंतर आयोगाकडून आकडे जाहीर

आयोगावर आकडेवारी उशिरा जाहीर करत त्यात काहीतरी गडबड आहे अस म्हणत होत होती टीका

दिल्लीत संथगतीने मतदान, ७ जागांवर ४४.६ टक्के मतदान

दिल्लीतील लोकसभेच्या ७ जागांवर आज मतदान होत आहे. दिल्लीत दुपारी ३ वाजेपर्यंत ४५.०७ टक्के मतदान झालं. लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या सहाव्या टप्प्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांची पत्नी सुनीता केजरीवाल यांनी मतदा केलं. दरम्यान काही ठिकाणी मतदान संथगतीने होत असल्याच्या तक्रारी मतदारांनी केल्या आहेत.

मुंबई शिक्षक मतदारसंघात इंडिया आघाडीतच फूट?

ठाकरे गटानं उमेदवार जाहीर केल्यानंतर समाजवादी गणराज्य पक्षही निवडणूक लढण्यावर ठाम

मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी सुभाष मोरे असणार उमेदवार

कपिल पाटिल समाजवादी गणराज्य पक्षाचे ‌विद्यमान आमदार

पुणे हिट अॅण्ड रन प्रकरण; अल्पवयीन मुलाच्या आजोबाला २८ मे पर्यंत पोलीस कोठडी

कल्याणीनगर अपघात प्रकरणाला दररोज वेगळ वळण मिळत आहे. दरम्यान आज चालकावर दबाव आणत त्याचं अपहरण केल्याबद्दल अल्पवयीन मुलाच्या आजोबाला आज अटक करण्यात आली होती. त्यांना न्यायालयाने २८ मे पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.

देशभरात दुपारी 3 वाजेपर्यंत 49.2 टक्के मतदान, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक

दुपारी 3 वाजेपर्यंत देशभरात 49.2 टक्के मतदान

राज्यनिहाय झालेल्या मतदानाची आकडेवारी -

बिहार - 45.21%

हरियाणा - 46.26%

जम्मू आणि काश्मीर - 44.41%

झारखंड - 54.34%

नवी दिल्ली - 44.58%

ओडिसा - 48.44%

उत्तर प्रदेश- 43.95%

पश्चिम बंगाल - 70.19%

लोकसभेच्या सहाव्या टप्प्यात ५८ मतदारसंघात  ३९.१३ टक्के मतदान 

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ६ राज्यांमधील ५८ मतदारसंघात आज मतदान सुरू आहे. दुपारी १ पर्यंत सर्व मतदारसंघांमध्ये ३९.१३ टक्के मतदान झालं आहे. आतापर्यंत ४२८ मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पाचव्या टप्प्यात ६२.२ टक्के मतदान झालं आहे.

डोंबिवली आमुदान केमिकल कपंनी स्फोट प्रकरणी मालती मेहता याची सुटका

मानपाडा पोलीस ठाण्यात आमुदान कंपनीची डायरेक्टर असल्याने सदोष मनुष्यवादाचा गुन्हा करण्यात आला होता दाखल

मालती मेहता हिला नाशिक मध्ये देवदर्शनासाठी जात असताना गुन्हे शाखा ने चौकशी साठी घेतले होते ताब्यात

मात्र चौकशीत तिचा कंपनीशी कुठला संबंध नसून ती पतीच्या मृत्यूनंतर कंपनी मुलाच्या नावाने असून तिचा कुठलाच संबंध नसल्याने पोलिसांनी चौकशी करत तिला घरी सोडले असल्याची पोलीस सूत्रांची माहिती

 Amit Shah: राहुलबाबा, आम्ही मोदींचे कार्यकर्ते, अॅटम बॉम्बला घाबरत नाही; अमित शहा कडाडले

भाजप नेते अमित शहा यांची हिमाचल प्रदेशच्या कांगरामध्ये सभा झाली. त्यावेळी त्यांनी काँग्रेसवर थेट निशाणा साधला. विकास ही भाजपची सवय झालीय. पाकव्याप्त काश्मीरवर बोलू नका, पाकिस्तानकडे अॅटम बॉम्ब आहे, असं बोलून काँग्रेस नेते आम्हाला घाबरवत आहेत. पण मी कांगराच्या भूमीवरून स्पष्ट सांगतो की, राहुलबाबा, आम्ही मोदींचे कार्यकर्ते आहोत, अॅटम बॉम्बला आम्ही घाबरत नाही. पाकव्याप्त काश्मीर भारताचा भाग आहे आणि तो आम्ही मिळवणारच, असं शहांनी ठणकावून सांगितलं.

महेंद्रसिंग धोनीनं बजावला मतदानाचा हक्क, केंद्रावर उसळली तोबा गर्दी

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यानं झारखंडमधील रांचीतल्या जेव्हीएम श्यामली स्कूलमधील केंद्रावर मतदान केलं. यावेळी त्याच्यासोबत पत्नी होती. धोनीला बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

CM Kejriwal : अरविंद केजरीवाल यांचं कुटुंबासह मतदान; मतदारांनाही केलं आवाहन

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कुटुंबासह मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. हुकूमशाहीविरोधात मतदान करावे, असे आवाहन त्यांनी मतदारांना केलं.

ईव्हीएमसंबंधी ते व्हायरल व्हिडिओ जुने, राज्यातील मतदान प्रक्रिया सुरळीत - निवडणूक आयोग

मतदान प्रक्रिया बाधित करणारे किंवा तसं भासवणारे आणि ईव्हीएममध्ये छेडछाड होत असताना दाखवलेले इतर राज्यांतील जुने व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केले जात असल्याचं निदर्शनास आलंय. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीशी त्यांचा काहीही संबंध नाही. मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडलीय, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं स्पष्ट केलंय.

Narendra Modi : एका बाजूला २४ तास काम करणारे मोदी, दुसरीकडे इंडिया आघाडीकडे काही काम नाही- नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या पाटलीपुत्रमध्ये जाहीर सभेला संबोधित केलं. यावेळी मोदींनी काँग्रेससह इंडिया आघाडीला लक्ष्य केलं. एका बाजूला तुमच्यासाठी २४ तास काम करणारा मोदी आहे. जो तुमच्यासाठी कठोर मेहनत करतोय. दुसरीकडे इंडिया आघाडी आहे, जी तुमच्यासाठी खोटं बोलतेय, असा हल्लाबोल नरेंद्र मोदींनी केला. २०४७ पर्यंत विकसित भारत करण्यासाठी हा मोदी सात दिवस २४ तास काम करत आहे. आत्मनिर्भर भारतासाठी काम करत आहे. दुसरीकडे इंडिया आघाडीकडं काही कामच उरलेलं नाही. लोकांनी त्यांना कधीच हद्दपार केलं आहे. त्यामुळे आता ते मोदींच्या नावानं शिव्या देत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

पदवीधर, शिक्षक मतदारसंघांसाठी महायुतीकडून उमेदवारांच्या नावांची चाचपणी

कोकण पदवीधर मतदारसंघासाठी महायुतीकडून निरंजन डावखरे यांना पुन्हा संधी मिळणार

मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी शिवसेना शिंदे गटाकडून डॉ. दीपक सावंत यांच्या नावाची चर्चा

शिक्षक मतदारसंघांसाठी उमेदवारांच्या नावांची चाचपणी सुरू

येत्या दोन दिवसांत महायुतीचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता

Loksabha Election Phase 6 : सहाव्या टप्प्यात सकाळी ११ पर्यंत २५.७६ टक्के मतदान, सर्वाधिक मतदान पश्चिम बंगालमध्ये

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात देशभरातील आठ राज्यांत मतदान होत आहे. सकाळी ११ पर्यंत सरासरी २५.७६ टक्के मतदान झालंय. बिहारमध्ये 23.67 टक्के, हरियाणा - 22.09 टक्के, जम्मू आणि काश्मीर - 23.11 टक्के, झारखंड - 27.80 टक्के, नवी दिल्ली - 21.69 टक्के, ओडिशा - 21.30 टक्के, उत्तर प्रदेश 27.06 टक्के, पश्चिम बंगालमध्ये 36.88 टक्के मतदान झालं आहे. आतापर्यंत सर्वाधिक मतदान पश्चिम बंगालमध्ये झालं आहे.

भाजप उमेदवार मनोज तिवारींनी केलं मतदान

उत्तर-पूर्व दिल्लीचे भाजप उमेदवार मनोज तिवारी यांनी मतदानाचा हक्क बजावला.

Delhi Loksabha : ४०० पार जागा नव्हे, पेट्रोलच्या किंमतींबद्दल बोलताहेत, कन्हैया कुमार यांचा भाजपला टोला

दिल्लीत काँग्रेस ३ आणि आम आदमी पक्ष ४ जागांवर विजयी होईल. मोठ्या संख्येने लोक मतदानासाठी बाहेर पडत आहेत. लोकांना परिवर्तन हवा आहे. बऱ्याच ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याचे सांगण्यात येत आहे. निवडणूक आयोग तात्काळ त्या दुरुस्त करील. विरोधक हे ४०० पार म्हणतात, पण ते पेट्रोलच्या किंमतींविषयी बोलत आहेत, असा टोला उत्तर पूर्व दिल्लीचे उमेदवार कन्हैया कुमार यांनी भाजपला लगावला.

Lok Sabha Election Voting Live : कपिल देव यांनी पत्नीसह बजावला मतदानाचा हक्क, मतदारांना केलं खास आवाहन

टीम इंडियाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी पत्नीसह मतदानाचा हक्क बजावला. दिल्लीतील मतदान केंद्रावर जाऊन कपिल देव यांनी मतदान केलं. विकासाची कामे करणाऱ्या योग्य उमेदवारांनाच आपले अनमोल मत द्या, असे आवाहन त्यांनी मतदारांना केलं आहे.

 Lok Sabha Election Voting Live : प्रियांका गांधींच्या मुला-मुलीने रांगेत उभे राहून केले मतदान

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांची मुले रेहान राजीव वड्रा आणि मिराया वड्रा यांनी पहिल्यांदाच मतदान केले. दिल्लीतील मतदान केंद्रावर जाऊन दोघांनाही मतदानाचा हक्क बजावला. "ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची असून संविधान वाचवण्यासाठी सर्वांनी मतदान करावं", असं आवाहन त्यांनी मतदारांना केलं.

Lok Sabha Election Voting : राहुल गांधी आणि सोनिया गांधींनी केलं मतदान; दोघांनीही घेतला सेल्फी

काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदान केंद्रातून बाहेर पडताना दोघांनी सेल्फीही घेतला. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.

Lok Sabha Election Voting : सहाव्या टप्प्यात सकाळी ९ वाजेपर्यंत १०. ८२ टक्के मतदान

बिहार - 9.66 %

हरियाणा - 8.31 %

जम्मू आणि काश्मीर - 8.89%

झारखंड - 11.74%

नवी दिल्ली - 8.94%

ओडिसा - 7.43%

उत्तर प्रदेश- 12.33%

पश्चिम बंगाल - 16.54%

Lok Sabha Election Voting: मतदानापूर्वी पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, टीएमसी कार्यकर्त्याची हत्या

लोकसभेच्या सहाव्या टप्प्यात पश्चिम बंगालमधील ८ लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. तृणमूल काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला आहे. यामागे भाजपचा हात असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे.

Delhi Voting Live Update : जुळ्या बहिणींनी पहिल्यांदाच बजावला मतदानाचा हक्क

दिल्लीतील जुळ्या बहिणी मधु कुमारी आणि रुची कुमारी यांनी मतदानाचा हक्क बजावला.

निर्माण भवन मतदार केंद्रावर जाऊन दोघींनीह एकाचवेळी मतदान केले.

देशातील सर्व पक्षाचा विचार करून आणि त्यांचे मुद्दे समजून घेऊन आम्ही मतदान केल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

मतदान हा प्रत्येकाचा आधिकर आहे त्यामुळं सगळ्यांनी तो बजावलाच पाहिजे, अशी प्रतिक्रियाही मधु आणि रुचीने दिली.

Delhi Voting Live Update : गौतम गंभीरने बजावला मतदानाचा हक्क, मतदारांना केलं खास आवाहन

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीर यांनी मतदानाचा हक्क बजावला. दिल्लीतील ओल्ड राजिंदर नगर येथील स्वामी दयानंद सर्वोदय कन्या विद्यालयातून जाऊन गौतम गंभीरने मतदान केले.

मतदान करणे आपले कर्तव्य असून लोकशाही आणखी मजबूत करण्यासाठी प्रत्येकाने मतदान करणे गरजेचे आहे. जास्तीत जास्त लोकांनी घराबाहेर पडून मतदान करावे असे आवाहन गौतम गंभीरने केले.

Delhi Voting Live Update : केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी बजावला मतदानाचा हक्क

केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी, त्यांची पत्नी लक्ष्मी पुरी यांनी दिल्लीतील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. नागरिकांनी घराबाहेर पडून लोकशाहीचा हक्क बजाववा असं आवाहन त्यांनी केलं आहे.

Delhi Lok Sabha Voting Live Update : नवी दिल्लीतील ७ लोकसभा मतदारसंघात मतदानाला सुरुवात

नवी दिल्लीतील ७ लोकसभा मतदारसंघात मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदान केंद्राबाहेर नागरिकांनी रांगा लावण्यास सुरुवात केली आहे. कोणताही अनूचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला आहे.

नवी दिल्लीतील 7 मतदार संघातील लढती

  • उत्तर पूर्व दिल्ली लोकसभा मतदार संघ

  • मनोज तिवारी (भाजप) विरुद्ध कन्हय्या कुमार (काँग्रेस)

  • चांदणी चौक लोकसभा मतदार संघ

  • प्रवीण खंडेलवाल (भाजप) विरुद्ध जे पी अग्रवाल (काँग्रेस)

  • उत्तर पश्चिम दिल्ली लोकसभा मतदार संघ

  • योगेंद्र चांदेलिया (भाजप) विरुद्ध उदित राज (काँग्रेस)

  • पूर्व दिल्ली लोकसभा मतदार संघ

  • हर्ष मल्होत्रा (भाजप) विरुद्ध कुलदीप कुमार (आप)

  • नवी दिल्ली लोकसभा मतदार संघ

  • बांसुरी स्वराज (भाजप) विरुद्ध सोमनाथ भारती (आप)

  • पश्चिम दिल्ली लोकसभा मतदार संघ

  • कमलजित सेहरावत (भाजप) विरुद्ध महाबल मिश्रा (आप)

  • दक्षिण दिल्ली लोकसभा मतदार संघ

  • रामविर सिंग बिधुरी (भाजप) विरुद्ध साही राम (आप

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्यात ८ राज्यांमधील एकूण ५८ लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे. यामध्ये दिल्लीसोबतच, उत्तर प्रदेशातील १४, हरियाणातील सर्व १०, बिहार आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी ८, ओडिशातील ६, झारखंडमधील ४ आणि जम्मू-काश्मीरमधील एका जागेचा समावेश आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com