Lok Sabha Election 2024: दिल्लीत वातावरण तापलं; मतदानाच्या धामधुमीत 'आप'चे उपराज्यपालांवर गंभीर आरोप

AAP Allegations LG Of Delhi Before Voting: दिल्लीमध्ये आज मतदान पार पडत आहे. या रणधुमाळीत आप नेत्या आतिशी यांनी नायब राज्यपालांवर गंभीर आरोप केले आहेत.
दिल्लीमध्ये आज मतदान
Lok Sabha Election 2024Saam Tv

दिल्लीमध्ये आज सहाव्या टप्प्यात मतदान पार पडत आहे. या लोकसभेच्या रणधुमाळीत आप नेत्या आतिशी यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत दिल्लीच्या उपराज्यपालांवर गंभीर आरोप केले आहेत. दिल्ली सरकारच्या मंत्री आतिशी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्यांनी नायब राज्यपालांवर निशाणा साधला आहे.

या पोस्टमध्ये त्यांनी (Aatishi Marlena) म्हटलंय की, ज्या ठिकाणी इंडिया आघाडीची मतदार संख्या जास्त आहे. त्या ठिकाणी प्रशासनाकडून स्लो मतदान (Lok Sabha Election) प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. दिल्ली पोलिसांना हा आदेश दिल्याचा उल्लेख त्यांनी आपल्या पोस्टमध्ये केला आहे. मतदान सुरू होण्यापूर्वी आतिशींनी त्यांच्या अकाउंटवर ही पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे दिल्लीच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाल्याचं दिसत आहे. नायब राज्यपालांनी असे आदेश दिल्ली पोलिसांना दिल्याचं आप नेत्या आतिशी यांनी म्हटलं (AAP Allegations On LG) आहे.

लोकांना मतदान करताना अडचण यावी, म्हणून इंडिया आघाडीचे मतदार (Voting) मोठ्या संख्येने असलेल्या भागात मतदानाचा वेग कमी करण्याचे आदेश दिल्ली पोलिसांना दिले आहेत. भाजपला विजयी करण्याचा प्रशासनाचा असा प्रयत्न बेकायदेशीर, अलोकतांत्रिक आणि असंवैधानिक आहे. मला आशा आहे की निवडणूक आयोग याची दखल घेईल आणि असे कोणतेही प्रयत्न थांबवेल, असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलेलं आहे.

दिल्लीमध्ये आज मतदान
Maharashtra Lok Sabha: संकटमोचकालाच टेंशन? भाजपच्या पॉकेट्समध्येच कमी मतदान? नाशिक, दिंडोरीत बूथनिहाय रिपोर्ट मागवला

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) सहाव्या टप्प्यासाठी २५ मे रोजी म्हणजेच आज मतदान होत आहे. या टप्प्यात दिल्लीतील सात जागांवर आज मतदान सुरू झालेलं आहे. दिल्लीत आम आदमी पक्ष आणि काँग्रेस एकत्र निवडणूक लढवत आहेत. भाजपने सातही जागांवर त्यांचे उमेदवार उभे केले आहेत. आतिशी यांची पोस्ट शेअर करताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलंय की, 'हे धक्कादायक आहे.निवडणूक आयोगाने दिल्लीत मतदानाची खात्री करावी.

दिल्लीमध्ये आज मतदान
Lok Sabha Election: अबकी बार 400 पार कसं शक्य? काय आहे भाजपचा मेगा प्लॅन? महाराष्ट्रातील नुकसान कुठून भरुन निघणार?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com