Lok Sabha Election: अबकी बार 400 पार कसं शक्य? काय आहे भाजपचा मेगा प्लॅन? महाराष्ट्रातील नुकसान कुठून भरुन निघणार?

BJP News: भाजपने 400 पारचा नारा दिला असला तरी त्यात महाराष्ट्राची मोठी साथ नसेल त्यामुळे महाराष्ट्रात होणारे नुकसान दुसऱ्या राज्यांमध्ये भरून काढण्यात भाजपनं लक्ष केंद्रीत केले आहे.
अबकी बार 400 पार कसं शक्य? काय आहे भाजपचा मेगा प्लॅन? महाराष्ट्रातील नुकसान कुठून भरुन निघणार?
Pm Modi and Amit ShahSaam tv
Published On

तन्मय टिल्लू, साम टीव्ही, प्रतिनिधी

महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांवर काय निकाल लागणार, याकडे देशाचे लक्ष लागलंय. भाजपला 2019 प्रमाणे राज्यासह कर्नाटक, बिहार राज्यामध्ये यश मिळणार नसल्याचा दावा राजकीय विश्लेषकांचा आहे. भाजपने 400 पारचा नारा दिला असला तरी त्यात महाराष्ट्राची मोठी साथ नसेल त्यामुळे महाराष्ट्रात होणारे नुकसान दुसऱ्या राज्यांमध्ये भरून काढण्यात भाजपनं लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामध्ये पाच राज्य आघाडीवर आहेत. कोणती आहेत ती पाच राज्य ज्यावर भाजपची मदार असेल ते जाणून घेऊ....

भाजपची मदार 'या' राज्यांवर?

तेलगंणा आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, उत्तर प्रदेश या राज्यांवर भाजपने विशेष लक्ष केंद्रीत केलंय..या राज्यांमधून महाराष्ट्रात होणारे नुकसान भरून काढण्याचं भाजपचं टार्गेट आहे. यातच भाजपनं मात्र 400 च्या आसपास जागा मिळतील, हा दावा कायम ठेवत. प्लॅन बीची गरज नसल्याचं म्हटलंय. याबाबत बोलताना भाजप आमदार प्रविण दरेकर म्हणाले की, ''भाजपला 400 चे आसपास शंभर टक्के जागा मिळणार. त्यामुळे प्लॅन बीची गरज नाही.''

अबकी बार 400 पार कसं शक्य? काय आहे भाजपचा मेगा प्लॅन? महाराष्ट्रातील नुकसान कुठून भरुन निघणार?
Pune Car Accident: मोठी बातमी! पुणे अपघात प्रकरणी दोन पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन

भाजपला 2019च्या निवडणुकीत दक्षिण भारतातील कर्नाटकचा अपवाद वगळता म्हणावं तसं यश मिळालं नव्हतं. मात्र, तेलंगणात भाजप 10 जागा जिंकणार असल्याचा दावा खुद्द भाजप नेते, गृहमंत्री अमित शाह यांनी केलाय. तर आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडूंच्या टीडीपीसोबत भाजप युतीत आहे. तिथे भाजपला किती फायदा होतो हे पाहणं महत्त्वाचं असेल.

तर योगी मुख्यमंत्री असलेल्या आणि लोकसभेच्या सर्वाधिक जागा असलेल्या उत्तर प्रदेशात भाजपला 70हून अधिक जागा जिंकण्याचा विश्वास आहे. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांची उत्तर प्रदेशामध्ये वाढती लोकप्रियता इथे भाजपला फायद्याची ठरेल असा अंदाज आहे. तिकडे पश्चिम बंगालमध्ये 42 जागा आहेत.इथे ध्रुवीकरणाचा मुद्दा भाजपच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे.

अबकी बार 400 पार कसं शक्य? काय आहे भाजपचा मेगा प्लॅन? महाराष्ट्रातील नुकसान कुठून भरुन निघणार?
Women Reservation Bill: महिला आरक्षण विधेयकावर मायावतींची पहिली प्रतिक्रिया; SC-ST, OBC महिलांसाठी केली विशेष मागणी

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीपूर्वी रंगलेलं राजकीय नाट्य,शिवसेना-राष्ट्रवादीत पडलेली फूट याचा एकत्रित परिणाम लोकसभा निवडणुकांवर झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच भाजपनं इतर राज्यांवर लक्ष केंद्रित केलंय. मात्र भाजपच्या नेत्यांना वाटणारा हा विश्वास मतपेटीतून भाजपच्या पारड्यात पडतो का आणि भाजपचा मेगा प्लॅन यशस्वी होतो का ? याची उत्तर 4 जूनलाच मिळेल...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com