Amit Shah: मोदी ७५ वर्षांचे झाले तरी पंतप्रधान तेच राहती, अरविंद केजरीवालांना अमित शाह यांचे प्रत्युत्तर

Lok Sabha Election 2024: भाजप पुन्हा सत्तेत आल्यावर अमित शाह हे पंतप्रधान होतील, असा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. यावर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केजरीवाल यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
मोदी ७५ वर्षांचे झाले तरी पंतप्रधान तेच राहती, अरविंद केजरीवालांना अमित शाह यांचे प्रत्युत्तर
Amit Shah On Arvind KejriwalSaam Tv
Published On

Amit Shah On Arvind Kejriwal:

भाजप पुन्हा सत्तेत आल्यावर अमित शाह हे पंतप्रधान होतील, असा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. यावर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केजरीवाल यांना प्रत्युत्तर दिलं आहे. शाह म्हणाले आहे की, ''मी अरविंद केजरीवाल आणि कंपनी आणि इंडियाच्या आघाडीला सांगू इच्छितो की, भाजपच्या घटनेत असे काहीही नाही. पंतप्रधान मोदी हे हा कार्यकाळ पूर्ण करणार आहेत आणि भविष्यातही पंतप्रधान मोदी देशाचे नेतृत्व करत राहतील. त्यामुळे मोदी 75 वर्षांचे झाले, तर त्यामुळे तुम्ही आनंदित होण्याची होण्याची आवश्यकता नाही.''

काय म्हणाले होते अरविंद केजरीवाल?

आज आप मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करताना अरविंद केजरीवाल म्हणाले होते, ‘ते (मोदी) पुढच्या वर्षी निवृत्त होतील. अमित शाह यांना पंतप्रधान करण्यासाठी ते मतं मागत आहेत. मोदींची गॅरंटी शाह पूर्ण करणार का? भाजप सत्तेत आल्यास 2 महिन्यांत उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री बदलेल, असा दावाही केजरीवाल यांनी केला.

मोदी ७५ वर्षांचे झाले तरी पंतप्रधान तेच राहती, अरविंद केजरीवालांना अमित शाह यांचे प्रत्युत्तर
Priyanka Gandhi: प्रियांका गांधींना पाहण्यासाठी नंदुरबारमध्ये उसळला जनसागर, VIDEO तील गर्दी पाहून अचंबित व्हाल

केजरीवाल हे तुरुंगात असताना भाजपने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. राजीनामा न देण्याबाबत ते म्हणाले, 'माझ्यासाठी मुख्यमंत्रीपद महत्त्वाचे नाही. खोट्या प्रकरणात राजीनामा देण्यास भाग पाडण्याचे षडयंत्र रचले गेल्याने मी मुख्यमंत्रीपद सोडले नाही. यालाच आता अमित शाह यांनी उत्तर दिलं.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीबाबत अमित शाह म्हणाले, 'तीन टप्प्यांत भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सर्व मित्रपक्ष 200 जागांच्या जवळपास पोहोचले आहेत. चौथा टप्पा एनडीएसाठी खूप चांगला आहे. तीन टप्प्यांपेक्षा चौथ्या टप्प्यात आम्हाला अधिक यश मिळेल. आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्येही चौथ्या टप्प्यात मतदान होत आहे. एनडीए आणि भाजपला दोन्ही राज्यात चांगलं यश मिळेल. ते म्हणाले की, 4 जून रोजी निकाल येतील तेव्हा दक्षिण भारतातील कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू आणि केरळमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येईल. तेलंगणात भाजप 10 पेक्षा जास्त जागा जिंकेल.

मोदी ७५ वर्षांचे झाले तरी पंतप्रधान तेच राहती, अरविंद केजरीवालांना अमित शाह यांचे प्रत्युत्तर
Arvind Kejriwal : तुरुंगात गेल्यानंतरही मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा का दिला नाही? अरविंद केजरीवालांनी सांगितली कारणे

शहा म्हणाले, 'बीआरएस आणि काँग्रेस पक्ष व्होट बँकेचे राजकारण आणि भ्रष्टाचारात बुडाले आहेत. घराणेशाही, भ्रष्टाचार, कुचकामी कारभार आणि तुष्टीकरणाच्या राजकारणाने तेलंगणातील जनता त्रस्त आहे. सरकार कोणाचेही असो, सरकारचे स्टेअरिंग नेहमीच असदुद्दीन ओवेसी यांच्या हातात राहिले आहे. हे लोक सीएएला विरोध करतात, 370 हटवायला विरोध करतात, सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित करतात. सर्वात मोठी गोष्ट, जी संपूर्ण देशासाठी आणि विशेषतः एसटी, एसटी आणि ओबीसीसाठी हानिकारक आहे, ती म्हणजे त्यांनी तेलंगणात 4 टक्के मुस्लिम आरक्षण आणले आहे. तेलंगणात जेव्हा भाजपचे सरकार येईल, तेव्हा येथून मुस्लिम आरक्षण संपवू.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com