Pune Car Accident: मोठी बातमी! पुणे अपघात प्रकरणी दोन पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन

Pune Porsche Car Accident Latest Update: पुणे अपघात प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यातील दोन पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे.
पोर्शे कार अपघात प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आला? पुणे पोलीस आयुक्तांनी दिली महत्वाची माहिती
Pune Porsche Car Accident Latest UpdateSaam Tv

अक्षय बडवे, साम टीव्ही, पुणे प्रतिनिधी

पुणे अपघात प्रकरणी एक मोठी बातमी समोर आली आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यातील दोन पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. ड्रंक-ड्राईव्ह प्रकरणी पुणे पोलिसांनी चौकशीसाठी एक इन्टर्नल कमिटी बनवली होती. त्यातच हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, क्राईम पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहायक पोलीस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांचं निलंबन करण्यात आलं आहे. यांच्यावर झालेल्या कारवाईचं कारणही समोर आलं आहे. सांगण्यात येत आहे की, अपघात झाल्यानंतर यांनी कंट्रोल रूमशी संपर्क केला नाही. तसेच नाईट राऊंडचे पोलीस उपायुक्त यांना माहिती न दिल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

पोर्शे कार अपघात प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आला? पुणे पोलीस आयुक्तांनी दिली महत्वाची माहिती
Hit and Run Video: भरधाव कारच्या धडकेत तरुण 20 फूट उंच हवेत उडाला, थरारक CCTV व्हिडिओ आला समोर

दरम्यान, येरवडा पोलीस ठाण्यात असलेला अपघाताचा गुन्हा आता गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. येरवडा पोलीस ठाण्याच्या सहायक पोलिस आयुक्त आरती बनसोडे यांच्याकडून हा तपास काढातून घेण्यात आला आहे. गुन्ह्याची व्याप्ती वाढल्याने, तसेच येरवडा पोलिसांच्या भूमिकेबद्दल संशय निर्माण झाल्यामुळे पोलीस आयुक्तांनी हा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात येत आहे. यापुढे गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे याप्रकरणी तपास करणार आहेत.

पोर्शे कार अपघात प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आला? पुणे पोलीस आयुक्तांनी दिली महत्वाची माहिती
Vishal Agarwal News: विशाल अग्रवाल यांच्या अडचणीत वाढ, आणखी दोन गुन्हे दाखल होणार, कारण काय?

विशाल अग्रवाल यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

दरम्यान, पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपाचे वडील विशाल अग्रवाल यांना आज न्यायालयात हजार करण्यात आलं होतं. न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यांच्यासह आज सहा आरोपींना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली सुनावली आहे. चार आरोपी हे पबचे मालक आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com