Women Reservation Bill: महिला आरक्षण विधेयकावर मायावतींची पहिली प्रतिक्रिया; SC-ST, OBC महिलांसाठी केली विशेष मागणी

Mayavati On Women Reservation Bill: उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनीही महिला आरक्षण विधेयकावर भाष्य केलं आहे.
Women Reservation Bill
Women Reservation BillSaam tv
Published On

Women's Reservation Bill:

मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटमध्ये महिला आरक्षणाच्या विधेयकाला मंजुरी मिळाली. या विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर अनेक राजकीय पक्षाकडून स्वागत करण्यात येत आहे, तर काही पक्षांनी आरक्षण आणखी वाढवून देण्याची मागणी केली आहे. याचदरम्यान, उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनीही महिला आरक्षण विधेयकावर भाष्य केलं आहे. (Latest Marathi News)

उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी पत्रकार परिषद घेऊन महिला आरक्षण विधेयकावर भाष्य केलं. मायावती म्हणाल्या, 'अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाची चुकीच्या पद्धतीने अंमलबजावणी केली जात आहे. केंद्र सरकारने आणलेल्या विधेयकाचं आम्ही समर्थन करतो. एससी, एसटी, ओबीसी महिलांसाठी आरक्षणाचा विशेष कोटा असला पाहिजे. अशी तरतूद न केल्यास या वर्गांवर अन्याय होईल. अशा पद्धतीने महिला आरक्षणाचं विधेयक मांडलं न गेल्यास बहुजन समाज पक्ष विरोध करेल'.

Women Reservation Bill
Yogi Adityanath : मुलींची छेड काढाल तर लक्षात ठेवा, यम वाट बघतोय; CM योगींचा थेट इशारा

मायावती जुन्या संसद भवनाबद्दल बोलताना म्हणाल्या, 'मला संसदेच्या दोन्ही सदनात जाण्याची संधी मिळाली. आम्ही नव्या संसद भवनाचं स्वागत करतो'.

दरम्यान, आज नव्या संसद भवनात महिला आरक्षण विधेयक सादर करण्यात येणार आहे. या विधेयकाला बहुजन समाज पक्ष पाठिंबा देणार आहे.

दरम्यान, भाजप आमदार गणेश नाईक यांनी देखील महिला आरक्षण विधयेकावर भाष्य केलं आहे. गणेश नाईक म्हणाले, 'आज नवीन संसद भवनात महिला विधेयक पारित होणार आहे. यात महिलांना 33 टक्के आरक्षण दिले जाणार आहे. माझ्या मते हिंमत करून महिलांना 33 टक्क्यांऐवजी 50 टक्के आरक्षण द्यावे, अशी मागणी भाजप आमदार गणेश नाईक यांनी केली आहे.

'लोकसभा आणि विधानसभेत महिलांना आरक्षण दिलं जाणार असल्याने काही जणांची निश्चित अडचण होणार आहे. महिलांना समानसंधी मिळावी यासाठी हे होणं गरजेचं असल्याचंही नाईकांनी म्हटलं आहे.

Women Reservation Bill
Women Reservation Bill: मोदी सरकार महिला आरक्षणासाठी घटनेत दुरुस्ती करणार; काय आहे 'नारीशक्ती वंदन' कायदा?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com