Maharashtra Lok Sabha: संकटमोचकालाच टेंशन? भाजपच्या पॉकेट्समध्येच कमी मतदान? नाशिक, दिंडोरीत बूथनिहाय रिपोर्ट मागवला

Lok Sabha Election 2024: नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघामध्ये भाजपची ताकद असूनही कमी मतदान झाल्याची दखल वरीष्ठांनी घेतली आहे. भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघांतील बूथनिहाय टक्केवारीचा अहवाल मागवला आहे.
संकटमोचकालाच टेंशन? भाजपच्या पॉकेट्समध्येच कमी मतदान? नाशिक, दिंडोरीत बूथनिहाय रिपोर्ट मागवला
Hemant Godse and Bharti Pawar Saam Tv

गिरीश निकम, साम टीव्ही, प्रतिनिधी

नाशिक आणि दिंडोरीत मतदानाचा टक्का वाढला खरा. मात्र यामुळे महायुतीचं टेंशन कमी होण्याऐवजी वाढल्याचीच चर्चा आहे. नाशिकमध्ये शिंदे गटाचे हेमंत गोडसे मैदानात होते, तर दिंडोरीत भाजपच्या भारती पवार मैदानात होत्या. मात्र भाजपची ताकद असलेल्या ठिकाणी कमी मतदान कमी झालंय. याच कारणामुळे भाजपचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन यांचं टेन्शन वाढलंय.

नाशिकची जबाबदारी असलेल्या गिरीश महाजन यांनी गंभीर दखल घेतलीय. भाजपच्या पॉकेट्समध्ये घटलेल्या मतदानावर महाजनांनी बुथनिहाय अहवालच मागवलाय.

संकटमोचकालाच टेंशन? भाजपच्या पॉकेट्समध्येच कमी मतदान? नाशिक, दिंडोरीत बूथनिहाय रिपोर्ट मागवला
Dombivli MIDC Fire Update: डोंबिवली कारखान्यातील बॉयलरला नव्हती परवानगी, कामगार विभागाची धक्कादायक माहिती; मृतांची संख्या वाढली

नाशिक शहरातील तीन मतदारसंघांसह भाजपचे आमदार आहेत. तर जिल्हा परिषदेतही भाजपची ताकद आहे. नाशिक शहरात महायुतीचे १०५ माजी नगरसेवक आहेत. जिल्हा परिषदेचेही पन्नासच्या आसपास माजी सदस्य आहेत. नाशिक मतदारसंघात महायुतीचे पाच आमदार तर दिंडोरीत महायुतीचे सर्व सहा आमदार आहेत.

तर या दोन्ही लोकसभा मतदारसंघांत महायुतीसाठी प्रतिकूल वातावरण असल्याने महाजन यांनी या जागा जिंकण्यासाठी नाशिकमध्ये तीन दिवस तळ ठोकला होता. मात्र तरीही भाजपचा प्रभाव असलेल्या ठिकाणी मतदान कमी का झालं ? याची कारणे शोधली जात आहेत. विशेष पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पिंपळगावमध्ये प्रचारसभा घेतली. मात्र या सभेत कांद्याच्या प्रश्नावरून गोंधळ झाला.

संकटमोचकालाच टेंशन? भाजपच्या पॉकेट्समध्येच कमी मतदान? नाशिक, दिंडोरीत बूथनिहाय रिपोर्ट मागवला
काॅंग्रेसच्या स्नेहभोजनानंतर मविआत मिठाचा खडा? नाना पटाेलेंनी स्पष्टच सांगितलं

तर महायुतीच्या उमेदवारांनाही प्रचारादरम्यान कांदा उत्पादकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. त्यामुळे कांदाच रडवणार की काय अशी चर्चा सुरू झालीय. या कारणामुळेच भाजपचे संकटमोचक समजले जाणारे गिरीश महाजनच यामुळे टेंशनमध्ये आले आहेत. मात्र संकट कुणावर येणार हे 4 जूनलाच स्पष्ट होणार.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com