काॅंग्रेसच्या स्नेहभोजनानंतर मविआत मिठाचा खडा? नाना पटाेलेंनी स्पष्टच सांगितलं

Nana Patole On Sangli Congress : जेव्हा केंद्रात काँग्रेसची सत्ता येइल तेव्हा सर्व प्रश्न निकाली निघतील असा विश्वास काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटाेलेंनी व्यक्त केला.
काॅंग्रेसच्या स्नेहभोजनानंतर मविआत मिठाचा खडा? नाना पटाेलेंनी स्पष्टच सांगितलं
nana patole statement on vishal patil attendance for congress party dinnerSaam Digital

- शुभम देशमुख

प्रत्येक जिल्ह्यात एकमेकांशी संबंध असतात. विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांची भाऊबंधकी आहे. त्यामुळे ते स्नेहभोजनाला आले असतील. सांगलीत लाेकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पंजा नव्हताच असे म्हणत सांगली येथील काॅंग्रेसच्या जेवणावळीवर प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी आज (गुरुवार) पाठराखण केली. पटाेले यांच्या आत्ताच्या भूमिकेमुळे काँग्रेस पक्षाचा विशाल पाटील यांना आतून पाठिंबा होता की काय असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

ठाकरे गटाने सांगलीत पाणी टंचाईकडे लक्ष द्यावं : नाना पटाेले

सांगली येथील काँग्रेसच्या स्नेहभोजन कार्यक्रमाला बंडखोर विशाल पाटील, विश्वजीत कदम हे आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. यावर ठाकरे गट आक्रमक झालं असुन ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुखांनी विधानसभा निवडणुकीत सांगलीतील सर्व विधानसभेच्या जागा पाडू असे म्हटले.

त्यावर नाना पटोलेंनी हे सर्व जनतेच्या हातात असते नेत्यांच्या नाही अशी टिप्पणी केली. त्यामुळे जनता ठरवेल. सांगलीत पाणीटंचाई आहे त्यावर बोलायला पाहिजे असा टाेला नाना पटोलेंनी ठाकरे गटाच्या टीकाकरांना लगावला. त्यामुळे महाविकास आघाडीत आलबेल असल्याचे दिसून येत आहे.

काॅंग्रेसच्या स्नेहभोजनानंतर मविआत मिठाचा खडा? नाना पटाेलेंनी स्पष्टच सांगितलं
Raigad Fort Trek News: शिवप्रेमींसाठी महत्वाची बातमी, किल्ले रायगडावरील पायरी मार्ग राहणार दाेन दिवस बंद; जिल्हाधिका-यांचा आदेश

काँग्रेसची केंद्रात सत्ता आल्यावर सर्व प्रश्न निकाली निघतील : नाना पटाेले

सन 2010 मध्ये पश्चिम बंगाल सरकारने मुस्लिम जातींना ओबीसी प्रवर्गात दर्जा दिला होता. मात्र आता कोलकाता उच्च न्यायालयाने हे आरक्षण रद्द केला आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी आक्रमक झाल्या आहेत.

त्यावर नाना पटोले म्हणाले राहुल गांधी यांनी जातीनिहाय जनगणना करावी असे बोलले त्या आधारावर जातीनिहाय जनगणना झाली तर प्रश्न निघू शकतात. हा विषय त्या राज्याचा आहे. त्यामुळे तेथील राज्यकर्ते न्याय मागायला कुठे पण जाऊ शकतात. जेव्हा केंद्रात काँग्रेसची सत्ता येइल तेव्हा सर्व प्रश्न निकाली निघतील असा विश्वास पटाेलेंनी व्यक्त केला.

Edited By : Siddharth Latkar

काॅंग्रेसच्या स्नेहभोजनानंतर मविआत मिठाचा खडा? नाना पटाेलेंनी स्पष्टच सांगितलं
कराड : टॅकरमधून गॅस गळती, जाणून घ्या पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतुकीची स्थिती, Video

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com