

८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. आपणही घरामध्ये आईला, ताईला शुभेच्छा देतो. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत प्रत्येक स्त्री ही कुटुंबाची संपूर्ण काळजी घेते. म्हणजे जर महिला एखाद्या घरात नसेल तर त्या घराची अवस्था पाहण्यासारखी नसते, असं आपण म्हणूच शकतो. पण तीच्या आरोग्याकडे लक्ष देणं ही इतरांची जबाबदारीच आहे.
कारण एकदा का स्त्रिया आजारी पडल्या की अनेक कामाचा खोलंबा होतो. किंवा त्या त्यांची दुखणी दुर्लक्षित करत असल्यामुळे त्यांना एकदाच मोठा धक्का बसू शकतो. त्यामुळे या स्पेशल दिवशी तुमच्या घरातल्या प्रत्येक महिलेला किंवा २० ते ६० वयोगटातल्यांनी काही टेस्ट वेळीच करणं गरजेचं असतं. कारण जसजसं मुलींच वय वाढतं तसतसं शरीरात अनेक बदल होत असतात. नियमित तपासण्या केल्याने अनेक गंभीर आजार सुरुवातीच्या टप्प्यातच ओळखता येतात आणि योग्य वेळी उपचार करणे शक्य होते.
प्रत्येक तरुणीने 20 वयात प्रामुख्याने प्रिव्हेंटिव्ह हेल्थ स्क्रीनिंग आणि प्रजनन आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. पुढे टेस्टची नावे दिली आहेत.
1. पॅप स्मिअर टेस्ट (सर्व्हायकल कॅन्सर तपासणी)
2.HPV लसीकरण
3. STI (Sexually Transmitted Infection) स्क्रीनिंग
4. हिमोग्लोबिन व ब्लड शुगर टेस्ट
5. थायरॉइड फंक्शन टेस्ट
6. दर महिन्याला ब्रेस्ट सेल्फ-एग्जामिनेशन
प्रत्येक तिशीतल्या महिलांमध्ये हार्मोनल बदल, प्रेग्नन्सी प्लॅनिंग आणि मेटाबोलिक समस्यांचा धोका वाढतो. त्यामुळे पुढील टेस्ट एकदा नक्की करुन घ्या.
1. पॅप स्मिअर व HPV टेस्ट (3 ते 5 वर्षांनी)
2. क्लिनिकल ब्रेस्ट एग्जामिनेशन
3. सुरुवातीची मॅमोग्राफी (फॅमिली हिस्ट्री असल्यास)
4. ब्लड शुगर आणि डायबिटीज स्क्रीनिंग
5. कोलेस्ट्रॉल व लिपिड प्रोफाइल
6. व्हिटॅमिन कमतरता तपासणी
7. प्रजनन आरोग्य तपासणी
चाळिशीत कॅन्सर स्क्रीनिंग आणि पेरिमेनोपॉजच्या बदलांवर लक्ष देणं आवश्यक असते. या वयात पुढील टेस्ट करणं योग्य राहील.
1. दरवर्षी मॅमोग्राम
2. ब्लड प्रेशर तपासणी
3. डायबिटीज स्क्रीनिंग
4. लिपिड प्रोफाइल टेस्ट
5. थायरॉइड टेस्ट
6. हार्मोनल तपासणी
7. बोन डेंसिटी टेस्ट (गरज असल्यास)
पन्नाशीतल्या महिलांनी काळात अनेक महिलांना मेनोपॉज येतो, त्यामुळे हाडे, हृदय आणि कॅन्सरशी संबंधित तपासण्या महत्त्वाच्या ठरतात. त्यांच्यासाठी महत्त्वाचे टेस्ट पुढील प्रमाणे आहेत.
1. बोन मिनरल डेंसिटी टेस्ट (ऑस्टिओपोरोसिस तपासणी)
2. नियमित मॅमोग्राफी
3.कोलन कॅन्सर स्क्रीनिंग
4. हार्ट हेल्थ तपासणी
5. मेनोपॉज लक्षणांचे मूल्यांकन
वयाच्या साठीत दीर्घकालीन आरोग्य आणि जीवनाची गुणवत्ता टिकवण्यासाठी नियमित तपासणी गरजेची असते. त्यासाठी पुढील टेस्ट नक्कीच करा
1. ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग
2. हाडांची तपासणी
3. हृदयविकार तपासणी
4. पेल्विक तपासणी
5. किडनी फंक्शन टेस्ट (RFT)
6. लिव्हर फंक्शन टेस्ट (LFT)
7. मेंदू व स्मरणशक्ती तपासणी
नियमित तपासण्यांमुळे सर्व्हायकल कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, हृदयविकार आणि ऑस्टिओपोरोसिस यांसारख्या गंभीर आजारांचे लवकर निदान होऊ शकते. योग्य वेळी तपासणी केल्यास महिलांना आरोग्यदायी आणि दीर्घ आयुष्य जगणे शक्य होते.
मेनोपॉजनंतर अचानक ब्लीडिंग, सतत पोट फुगणे किंवा इतर असामान्य लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.