Microplastics And Cancer: तरूणांमध्ये अचानक का वाढतायत कॅन्सरची प्रकरणं; नव्या अभ्यासातून धक्कादायक बाब समोर

Can Microplastics Cause Colon Cancer: जगभरात कोलन कॅन्सरच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे. नवीन संशोधनानुसार मायक्रोप्लास्टिक्सचे शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात आणि ते आतड्यांच्या आरोग्यावरही परिणाम करू शकतात.
Can Microplastics Cause Colon Cancer
Can Microplastics Cause Colon Cancersaam tv
Published On

जगभरात कॅन्सरचे रुग्ण वाढताना दिसतायत. अशातच एका नवीन अभ्यासात कॅन्सरच्या खास करून कोलन कॅन्सरच्या वाढत्या प्रकरणांबाबत चिंता व्यक्त करण्यात आलीये. आधुनिक वैद्यकीय प्रगती आणि टेक्नॉलॉजीमुळे जगभरात अनेक प्रकारच्या कॅन्सरमध्ये घट होतेय. परंतु कोलोरेक्टल कॅन्सर किंवा कोलन कॅन्सर हे तरुणांमध्ये वेगाने वाढताना दिसतंय.

काय आहेत या कॅन्सरची लक्षणं?

कोलन कॅन्सरच्या सामान्य लक्षणांमध्ये पोटदुखी, शौचामध्ये रक्त दिसणं आणि दीर्घकाळापर्यंत पोटात अस्वस्थता यांचा समावेश असू शकतो. बरेच लोक या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. त्यांना वाटतं की, ही फक्त पोटाची एक साधी समस्या आहे. दरम्यान डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, जर तुम्हाला ही लक्षणं जाणवत असतील तर चाचणी घेणं अत्यंत महत्वाचं आहे. आता नवीन संशोधनानुसार, शरीरात मायक्रोप्लास्टिक्सचं वाढतं प्रमाण या आजाराचं कारण असू शकतं.

सदर्न कॅलिफोर्निया युनिवर्सिटीतील संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, मायक्रोप्लास्टिक्सचे आपल्या शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात. हे लहान प्लास्टिक कण कोलन कॅन्सर, फुफ्फुसांचे आजार आणि प्रजनन क्षमतेवरही नकारात्मक परिणाम करू शकतात.

Can Microplastics Cause Colon Cancer
Male breast cancer signs: महिलांप्रमाणे पुरुषांनाही होऊ शकतो ब्रेस्ट कॅन्सर; शरीरात कोणती लक्षणं दिसतात?

प्रोफेसर ट्रेसी जे. वुड्रफ यांच्या मते, आज वातावरणात सगळीकडे मायक्रोप्लास्टिक्स आढळतात. ते हवा, पाणी, समुद्रकिनारा, माती आणि अगदी अन्नात देखील तुम्हाला दिसून येतात. अंटार्क्टिका आणि खोल समुद्राच्या भागातही कण आढळले आहेत. त्यांच्या अत्यंत लहान आकारामुळे ते सहजपणे शरीरात प्रवेश करू शकतात आणि विविध अवयवांमध्ये जमा होऊ शकतात. काही अभ्यासांमध्ये प्लेसेंटा, आईच्या दुधात आणि यकृतामध्ये मायक्रोप्लास्टिक्सचे कण आढळून आलेत.

तज्ज्ञांचं म्हणणं काय?

तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, मायक्रोप्लास्टिक्स शरीरात जळजळ वाढवू शकतात आणि आतड्यांच्या आरोग्यावर परिणाम करू शकतात. म्हणूनच शास्त्रज्ञ आता त्यांचा कॅन्सरसारख्या गंभीर आजारांशी संबंध आहे का याचा शोध घेतायत. मायक्रोप्लास्टिक्स थेट कॅन्सरला कारणीभूत ठरतात हे अद्याप निश्चितपणे सिद्ध झालेलं नसलं तरी ते तुमच्या आरोग्यासाठ खूप धोकादायक ठरू शकतं.

Can Microplastics Cause Colon Cancer
Breast Cancer: भारतात महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा वाढता धोका; २०५० पर्यंत परिस्थिती गंभीर होणार, लॅन्सेटचा इशारा

काय आहेत कारणं?

डॉक्टरांचं म्हणणं आहे की, इतर अनेक घटक देखील कोलन कॅन्सरच्या जोखमीवर परिणाम करतात. ज्यामध्ये वय, लाल आणि प्रोसेस्ड मीटचं जास्त सेवन, फायबरची कमतरता, लठ्ठपणा, शारीरिक हालचालींचा अभाव आणि कॅन्सरचा कौटुंबिक इतिहास यांचा समावेश आहे.

Can Microplastics Cause Colon Cancer
Obesity health risks: सडपातळ दिसणाऱ्यांमध्येही लठ्ठपणाचा धोका; शरीराला आतून पोहोचतोय धोका; या तपासण्या नियमित करा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com