

कॅन्सरचं नाव ऐकताचं अनेकांच्या पायाखालची जमीन सरकते. हा आजार केवळ एका व्यक्तीवर नाही तर संपूर्ण कुटुंबावर परिणाम करतो. कॅन्सरच्या प्रकरणांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसतेय. खासकरून महिलांच्या ब्रेस्ट कॅन्सरमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे. जर यावर वेळीच नियंत्रण आणलं नाही तर २०५० पर्यंत ही स्थिती गंभीर होईल असा इशारा देण्यात आलाय.
२०४ देशांच्या अभ्यासानुसार, १९९० ते २०२३ या काळात ब्रेस्ट कॅन्सरच्या प्रकरणांमध्ये जवळपास १.३ पटीने वाढ होण्याची शक्यता आहे. स्टडीमध्ये दिलेल्या ६ रिस्क फॅक्टरवर वेळीच काम केलं नाही तर २०५० पर्यंत रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
द लॅन्सेट ऑन्कोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज स्टडी ब्रेस्ट कॅन्सर कोलॅबोरेटर्समध्ये असं म्हटलंय की, भारतात १९९० मध्ये १००,००० महिलांमागे १३ महिला अशी सरासरी होती. मात्र हे प्रमाण २०२३ मध्ये १००,००० महिलांमध्ये २९.४ इतकं झालं आहे. त्याच काळात मृत्युदर ८.९ वरून १५.५ पर्यंत वाढलाय. ज्यामुळे भारतात ब्रेस्ट कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्युंमध्ये ७४ टक्क्यांनी वाढ झालीये.
जगभरातील महिलांमध्ये कॅन्सरशी संबंधित आजार आणि अकाली मृत्यूचं प्रमुख कारण स्तनाचा कॅन्सर आहे. २०२३ पर्यंत अंदाजे २.३ दशलक्ष नवीन ब्रेस्ट कॅन्सरचे रुग्ण आणि ७,६०,००० मृत्यू अपेक्षित आहेत. लॅन्सेटच्या एका अभ्यासात असं दिसून आलंय की, आधुनिक उपचार असूनही २०५० पर्यंत रुग्णांची संख्या एक तृतीयांश वाढून ३.५ दशलक्ष होऊ शकते.
टाटा मेमोरियल सेंटरच्या एका नवीन अभ्यासामध्ये, आधुनिक कॅन्सरची औषधं विशेषतः इम्युनोथेरपी ही भारत आणि जगभरातील बहुतेक लोकांसाठी खूप महाग आहेत. अभ्यासानुसार, पेम्ब्रोलिझुमॅब या इम्युनोथेरपी औषधाचा सहा महिन्यांचा कोर्स बहुतेक भारतीयांच्या सरासरी मासिक उत्पन्नाच्या अंदाजे ८० पट जास्त आहे.
जगभरात, २०२३ मध्ये ५५ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या महिलांमध्ये २०-५४ वर्षे वयोगटातील महिलांपेक्षा तीन पट जास्त वेळा ब्रेस्ट कॅन्सरचे नवीन रुग्ण आढळतील. दरम्यान १९९० पासून २०-५४ वर्षे वयोगटातील महिलांमध्ये नवीन रुग्णांचं प्रमाण वाढलं आहे तर वृद्ध महिलांमध्ये हा दर कायम आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.