
हृदयरोग हे जागतिक मृत्यूचे प्रमुख कारण आहे
९९% पेक्षा जास्त रुग्णांमध्ये आधीच धोकादायक घटक होते
उच्च रक्तदाब सर्वात सामान्य धोका आहे
हृदयरोग आजही जगभरातील मृत्यूचं प्रमुख कारण मानलं जातं. हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकमुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण एकूण हृदयविकाराशी संबंधित मृत्यूंपैकी सुमारे 85% आहे. वैद्यकीय क्षेत्रात मोठी प्रगती झाली असली तरी तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, या गंभीर आजारांपासून बचावासाठी सर्वात प्रभावी साधनं ही अतिशय सोपी आहेत. जीवनशैलीतील सकारात्मक बदल आणि आजाराचं लवकर निदान.
‘जर्नल ऑफ द अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजी’मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनात अत्यंत महत्त्वाची बाब समोर आली आहे. या अभ्यासानुसार, हार्ट अटॅक, स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा त्रास झालेल्या 99% पेक्षा जास्त लोकांमध्ये त्यांच्या आजाराच्या आधीच किमान एक तरी मोठा आरोग्याचा धोकादायक घटक आढळून आला. म्हणजेच, गंभीर हृदयविकाराच्या घटनांपूर्वी शरीरात अनेक इशारे आधीपासूनच दिसत होते पण ते वेळेत ओळखले गेले नाहीत.
संशोधकांनी दक्षिण कोरियातील ९० लाखांहून अधिक आणि अमेरिकेतील जवळपास ७,००० लोकांच्या दीर्घकालीन आरोग्याच्या माहितीचं विश्लेषण केलं. त्यांनी चार प्रमुख धोकादायक घटकांवर विशेष लक्ष केंद्रित केलं. यामध्ये,
उच्च रक्तदाब
जास्त कोलेस्ट्रॉल
उपाशीपोटी वाढलेलं ग्लुकोज किंवा मधुमेह
तंबाखूचं सेवन
‘मेडिकल न्यूज टुडे’च्या अहवालानुसार, यामधील सर्वात सामान्य धोका म्हणजे उच्च रक्तदाब. तो दक्षिण कोरियातील 95% पेक्षा जास्त आणि अमेरिकेतील 93% पेक्षा जास्त लोकांमध्ये आढळून आला.
या अभ्यासाचे वरिष्ठ लेखक आणि नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटी फिनबर्ग स्कूल ऑफ मेडिसिनचे प्राध्यापक फिलिप ग्रीनलँड यांनी सांगितले, “हे सर्व मोठे जोखमीचे घटक आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते बदलता येण्यासारखे आहेत. जर ते जवळपास सर्व प्रकरणांमध्ये दिसून येत असतील तर प्रतिबंधाची मोठी संधी आहे.”
उच्च रक्तदाब ही अशी अवस्था आहे जी बहुतांश वेळा कोणतीही लक्षणं न दिसता शरीरात हळूहळू नुकसान करत राहतं. त्यामुळे अनेकदा तो गंभीर स्थिती निर्माण झाल्यानंतरच ओळखला जातो. अभ्यासात असंही दिसून आलंय की, तरुण महिलांमध्येही, ज्यांना साधारणपणे हृदयविकाराचा धोका कमी मानला जातो त्यांच्या हृदयविकाराच्या घटनांपूर्वी एक किंवा अधिक जोखमीचं घटक असल्याचं दिसून आलं.
मेमोरिअलकेअर सॅडलबॅक मेडिकल सेंटरचे कार्डिओलॉजिस्ट आणि वैद्यकीय संचालक डॉ. चेंग-हान चेन यांनी ‘मेडिकल न्यूज टुडे’ला सांगितलं की, “या अभ्यासामुळे हे पुन्हा एकदा स्पष्ट होते की हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी आपल्याला या जोखमीच्या घटकांची तपासणी आणि नियंत्रण करणं अत्यावश्यक आहे.”
हृदयरोगाचे प्रमुख कारण काय आहे?
उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, मधुमेह आणि तंबाखू ही कारणे आहेत.
हृदयविकारापूर्वी काय इशारे येतात?
बहुतेकांमध्ये एक तरी धोकादायक घटक आधी असतो.
सर्वात सामान्य धोका कोणता आहे?
उच्च रक्तदाब हा सर्वात सामान्य धोका आहे.
हे धोके कमी करता येतात का?
होय, हे धोके जीवनशैलीने बदलता येतात.
तरुण महिलांना हृदयरोग होतो का?
होय, त्यांच्यातही धोकादायक घटक आढळतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.