Heart attack
Heart attack newssaam t

Heart attack habits youth: तरुणपणात हृदयाचे आजार का वाढतायत? डॉक्टरांनी सांगितली कारणं... बघा तुमचं हार्ट धडधाकट आहे का?

young people heart attack risk factors: गेल्या काही वर्षांमध्ये, तरुणांमध्ये हृदयविकाराचा झटका (Heart Attack) किंवा कार्डियाक अरेस्ट (Cardiac Arrest) येण्याचे प्रमाण लक्षणीय वाढलंय. केवळ वृद्धच नव्हे तर तिशी-चाळिशीतील फिट आणि निरोगी दिसणाऱ्या व्यक्तींचाही यात समावेश आहे.
Published on

आजकाल तरुणांमध्ये हृदयविकाराच्या (Heart Disease) प्रकरणांची संख्या झपाट्याने वाढताना दिसतेय. यामागचे मुख्य कारणं म्हणजे लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि ताणतणाव. याशिवाय, चुकीचा आहार, शारीरिक हालचालींचा अभाव आणि धूम्रपान यामुळेही हृदयविकाराचा धोका वाढतो. हृदयाचं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी चांगल्या सवयी अवलंबणं आणि ताणतणावाचं व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे.

बदलत्या जीवनशैलीमुळे समस्या

हृदयविकाराची चर्चा होते तेव्हा सहसा ५०-६० वर्षे वयोगटातील रुग्ण डोळ्यासमोर येतात. पण सध्याचा ट्रेंड बदलताना दिसतोय. ४० वर्षांखालील लोकांमध्ये हृदयाचे आजार आणि हार्ट अटॅकची (Heart Attack) प्रकरणं लक्षणीय वाढली आहेत. त्यामुळे लवकर निदान करण्याबरोबरच त्याची कारणं समजून घेणंही गरजेचं आहे.

तरुणांमध्ये हृदयविकार का वाढतो?

पहिलं कारण

लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि इन्सुलिन रेसिस्टन्समुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. जीवनशैलीतील बदलांमुळे, या समस्या आता तरुणांमध्येही दिसून येतात. विशेषतः शहरी भागांमध्ये यांचं प्रमाण अधिक दिसून येतंय.

Heart attack
Diabetes: तुमच्या वयानुसार किती असली पाहिजे ब्लड शुगर लेवल? जाणून घ्या तुमच्या वयासाठी किती प्रमाण योग्य!

दुसरं कारण

ताणतणाव (Stress) शहरी जीवनाचा भाग झाला आहे. कामाचा ताण, कामाचे अधिक तास आणि धकाधकीचं जीवन यामुळे हृदयावर ताण निर्माण करतात. ताणतणाव, उच्च रक्तदाब, डोळ्यांच्या रक्तवाहिन्यांवर परिणाम आणि रक्तवाहिन्यांच्या अस्तरातील हानी निर्माण करू शकतो.

तिसरं कारण

जीवनशैलीमधील बदलांमुळे चुकीच्या आहाराच्या सवयी वाढल्या आहेत. प्रोसेस्ट फू्ड्स केलेले अन्न, साखरयुक्त पदार्थ, शारीरिक हालचालींचा अभाव, धूम्रपान, व्हेपिंग आणि मद्यपान या सवयी हृदयासाठी धोकादायक ठरतात.

Heart attack
Hair Loss In Females: महिलांमध्ये वाढत्या केसगळतीमागचं खरं कारण उघड! ‘या’ 6 गोष्टींची कमतरता ठरते धोकादायक

चौथं कारण

कोविड-नंतरचा काळ देखील दुर्लक्षित करू नये. अनेक रुग्ण ज्यांनी व्हायरस पासून बरं होऊन परतले. मात्र त्यांच्या सूक्ष्म रक्तवाहिन्यांचं नुकसान किंवा रक्त गुठळ्यांचे त्रास दिसून येतात, जे हृदयाच्या समस्या वाढवतात.

Heart attack
Period Pain Relief: मासिक पाळीच्या वेळी 'या' ड्रायफ्रूटचे सेवन करा, वेदना होतील कमी

काय करावं?

हृदयाची चांगली काळजी घेण्यासाठी ४० वर्षांपूर्वीच नियमित तपासणी सुरू करणं महत्त्वाचं आहे. विशेषतः दिल्ली, मुंबईसारख्या शहरांमध्ये, जिथे ताणतणाव दैनंदिन जीवनाचा भाग झाला आहे, तिथे रक्तदाब, लिपिड प्रोफाइल, फास्टिंग ग्लुकोज आणि रिस्क स्कोअर यांची तपासणी वेळोवेळी करणं गरजेचं आहे.

Heart attack
Piles pain relief: आता 5 मिनिटांत पाईल्सच्या वेदनांपासून होईल मुक्तता; डॉक्टरांनी सांगितला एक उत्तम आणि सोपा उपाय

हृदयाचे रक्षण करण्यासाठी काही टिप्स-

  • चांगल्या सवयी अंगीकारा- दररोज किमान ३० मिनिटे हलकी ते मध्यम व्यायाम करा.

  • आहारात बदल- प्रक्रिया केलेले अन्न आणि साखरेचं सेवन मर्यादित करा.

  • धूम्रपान आणि मद्यपान टाळा.

  • ताण व्यवस्थापन- ध्यान, योग किंवा विश्रांतीसाठी वेळ काढा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com