Diabetes: तुमच्या वयानुसार किती असली पाहिजे ब्लड शुगर लेवल? जाणून घ्या तुमच्या वयासाठी किती प्रमाण योग्य!

How Much Blood Sugar Level is Healthy: आपल्या शरीरात रक्तातील साखरेचं प्रमाण संतुलित ठेवणं गरजेचं आहे. मात्र, ही पातळी प्रत्येकासाठी एकसमान नसते. आपलं वय, शारीरिक श्रम, खाण्यापिण्याच्या सवयी आणि आपण मधुमेहग्रस्त आहोत की नाही, यावर रक्तातील साखरेचे 'सामान्य' प्रमाण अवलंबून असते.
How Much Blood Sugar Level is Healthy
How Much Blood Sugar Level is Healthysaam tv
Published On

मधुमेह म्हणजेच डायबिटीज हा एक अत्यंत गुंतागुंतीचा आजार आहे. एकदा हा झाला की, तो आयुष्यभर तुमची पाठ सोड नाही. आजपर्यंत वैज्ञानिकांना या आजारावर पूर्णपणे उपचार सापडलेले नाहीत. भारताला तर ‘मधुमेहाची राजधानी’ म्हटलं जातं, कारण आपल्या देशात या आजाराचे रुग्ण जगात सर्वाधिक आहेत.

How Much Blood Sugar Level is Healthy
Heart attack symptoms: छातीत दुखण्याव्यतिरीक्त हार्ट अटॅकची 'ही' इतरंही लक्षणं दिसतात; रात्रीच्या वेळेस होणारे बदल पाहा

काही वर्षांपूर्वी हा आजार प्रामुख्याने ४० ते ४५ वर्षे वयोगटातील व्यक्तींमध्ये दिसून यायचा. मात्र आज परिस्थिती बदलली आहे. आता नवजात बाळांपासून ते तरुणांपर्यंत अनेकांना मधुमेहाचा धोका निर्माण झाला आहे. रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणाबाहेर गेलं की, हा आजार अधिक गंभीर रूप घेतो आणि शरीरावर विविध पद्धतीने परिणाम करू लागतो.

डायबिटीजमुळे शरीर हळूहळू होतं कमकुवत

मधुमेहामुळे फक्त रक्तातील साखरेवर परिणाम होत नाही तर त्यातून इतर अनेक गंभीर आजारांचीही सुरुवात होते. डोळ्यांची दृष्टी कमी होणं, उच्च रक्तदाब, हृदयरोग, किडनीचे विकार यांसारख्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती आणि ताकद हळूहळू कमी होऊ लागते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, योग्य आहार पद्धती आणि नियमित व्यायाम यांच्या मदतीने मधुमेहाचा धोका काही प्रमाणात नियंत्रित करता येतो.

वयानुसार शुगर लेव्हल किती असली पाहिजे?

  • वयानुसार रक्तातील साखरेचं प्रमाण समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जर तुमचं वय १८ वर्षांपेक्षा जास्त असेल तर जेवणानंतर एक ते दोन तासांनी शुगर लेव्हल साधारण १४० mg/dL पर्यंत असणं योग्य मानलं जातं.

  • उपाशीपोटी म्हणजेच फास्टिंगमध्ये ९९ mg/dL पर्यंतची पातळी सामान्य मानली जाते. जर त्यापेक्षा शुगर वाढलेली असेल, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. कारण वेळेत उपाय न केल्यास आरोग्याशी संबंधित मोठे धोके संभवतात.

How Much Blood Sugar Level is Healthy
Gas and chest pain: छातीत वेदना झाल्या तर सावधान! गॅस आणि हार्ट अटॅकमधील खरा फरक समजून घ्या
  • ४० वर्षांनंतर नियमित रक्त तपासणी करणं महत्त्वाचं असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. या वयोगटात डायबिटीजचा धोका तुलनेने जास्त असतो.

  • ४० ते ५० वयोगटातील व्यक्तींमध्ये उपाशीपोटी शुगर लेव्हल ९० ते १३० mg/dL दरम्यान असली पाहिजे. जेवणानंतर ती १४० mg/dL पेक्षा कमी असणं योग्य आहे. रात्रीच्या जेवणानंतरची पातळी साधारण १५० mg/dL पर्यंत असू शकतं.

How Much Blood Sugar Level is Healthy
Heart Attack: छातीच्या या बाजूला दुखत असेल तर सावध व्हा, हार्ट अटॅकचं असू शकतं लक्षण!

शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी काय करावं?

डायबिटीजचे निदान झाल्यानंतर शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवणं अत्यावश्यक ठरतं. यासाठी रोजच्या जीवनात शारीरिक हालचालींना महत्त्व द्यावं. दररोज चालण्याची सवय लावल्यास आरोग्यासाठी मोठा फायदा होतो. आहाराच्या बाबतीत शक्य तितके तेलकट पदार्थ, गोड पदार्थ आणि प्रोसेस्ड फूड टाळले पाहिजेत. शिस्तबद्ध आहार आणि एक्टिव्ह जीवनशैली यांच्या मदतीने शुगर लेव्हल दीर्घकाळ संतुलित ठेवणं शक्य होतं.

How Much Blood Sugar Level is Healthy
Heart Health: छातीत दुखणं हे हार्ट अटॅकचं लक्षण नाही; प्रमुख लक्षण वेगळंच, नेमकं त्याकडे आपण करतो दुर्लक्ष

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com