Liver Cancer Symptoms: तुम्हाला सामान्य वाटणारी ही लक्षणं असून शकतात लिव्हर कॅन्सरची; शरीराच्या 'या' बदलांवर लक्ष द्या

Liver cancer early symptoms: यकृत (Liver) हा मानवी शरीरातील अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा अवयव आहे, जो रक्त शुद्ध करण्यापासून ते ऊर्जा निर्माण करण्यापर्यंत अनेक महत्त्वाची कार्ये करतो.
Liver cancer pain location
Liver cancer pain locationsaam tv
Published On

मानवी शरीरातील लिव्हर हा फार महत्त्वाचा अवयव मानला जातो. शरीरातील रक्त शुद्ध करणं, शरीराला गरजेची असणारी प्रोटीन तयार करणं, ऊर्जा साठवून ठेवणं त्याचप्रमाणे शरीरातील टॉक्सिन द्रव्यं बाहेर टाकणं या अनेक जीवनावश्यक प्रक्रिया यकृताद्वारे पार पाडल्या जातात. याशिवाय पचनक्रियेस मदत करणारे पित्त (bile) देखील यकृत तयार करतं.

मात्र, ज्यावेळी यकृतातील पेशी अनियमित आणि अनियंत्रित पद्धतीने वाढू लागतात त्यावेळी त्यातून लिव्हरचा कॅन्सर होण्याचा धोका वाढू लागतो. लिव्हरचा कॅन्सर हा एक गंभीर आजार असून तो संपूर्ण आरोग्य व्यवस्थेवर परिणाम करू शकतो.

काय आहे लिव्हरचा कॅन्सर होण्याची कारणं?

लिव्हर कॅन्सर अनेक कारणांमुळे होऊ शकतो. अतिप्रमाणात आणि दीर्घकाळ दारूचं सेवन, हिपॅटायटिस बी आणि सी या व्हायरसचं इन्फेक्शन होणं, फॅटी लिव्हर, लठ्ठपणा किंवा कुटुंबात कॅन्सरचा इतिहास असणं ही काही प्रमुख कारणं आहेत. कालांतराने हा कॅन्सर यकृताची रक्त शुद्धीकरण क्षमता कमी करतो. परिणामी शरीरात विषारी द्रव्यं साचू लागतात. त्यामुळे थकवा, अचानक वजन कमी होणं, भूक मंदावणं आणि पचनाशी संबंधित अडचणी दिसू लागतात.

Liver cancer pain location
Blood Sugar Level Control : आहारात हे बदल करुन पाहाच! रक्तातील साखर राहिल नियंत्रणात; मधुमेह होईल छुमंतर

यकृताच्या कॅन्सरचे प्रकार

यकृताच्या कॅन्सरचे दोन प्रमुख प्रकार मानले जातात-

  • हेपॅटोसेल्युलर कार्सिनोमा (HCC) – हा सर्वात सामान्य प्रकार असून तो थेट यकृतातील पेशींमध्ये विकसित होतो.

  • कोलांजिओकार्सिनोमा – हा कॅन्सर यकृतातील पित्तवाहिन्यांमध्ये (bile ducts) तयार होतो.

हा आजार धोकादायक का मानला जातो?

लिव्हरचा कॅन्सर विशेषतः धोकादायक मानला जातो कारण सुरुवातीची लक्षणं अत्यंत सौम्य स्वरूपाची असतात किंवा अनेकदा दुर्लक्षित केली जातात. त्यामुळे ज्यावेळी निदान केलं जातं तेव्हा आजार बऱ्याचदा पुढच्या टप्प्यावर पोहोचलेला असतो. लिव्हरची कार्यक्षमता कमी झाल्याने इतर अवयवांवरही परिणाम होतो आणि शरीर हळूहळू अशक्त बनत जातं.

Liver cancer pain location
तुमच्या वयोमानानुसार, रक्तामध्ये चांगलं कोलेस्ट्रॉल किती प्रमाणात असलं पाहिजे?

लिव्हरच्या कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं

एम्स (AIIMS) मधील गॅस्ट्रोएन्टेरॉलॉजी विभागाच्या माजी संचालक डॉ. अनन्या गुप्ता यांच्या मते, लिव्हरच्या कॅन्सरच्या सुरुवातीची लक्षणं हळूहळू दिसतात आणि अनेकदा इतर सामान्य लक्षणं म्हणून त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. या लक्षणांकडे जरूर लक्ष द्याल.

  • सतत थकवा जाणवणं

  • भूक मंदावणं किंवा वजन अनपेक्षितरीत्या कमी होणं

  • पोटाच्या उजव्या बाजूला वेदना जाणवणं

  • डोळे आणि त्वचा पिवळी पडणं

  • मळमळणं किंवा उलट्या होणं

आजार वाढल्यावर दिसणारी लक्षणं

आजार वाढल्यावर पोट आणि पाय सुजणं, शरीरात प्रचंड अशक्तपणा येणं, गंभीर अवस्थेत उलटीत रक्त येणं किंवा रक्तस्त्राव होणं यांसारखी लक्षणं दिसू शकतात. ही लक्षणं इतर आजारांसारखी वाटू शकतात. त्यामुळे वेळेत वैद्यकीय तपासणी करणं अत्यावश्यक आहे.

Liver cancer pain location
Sleep needs by age: वयाप्रमाणे झोपेची आवश्यकता बदलते; तुमच्या वयानुसार झोपण्याची योग्य वेळ कोणती?

निदानाचे मार्ग कोणते आहेत?

लिव्हर कॅन्सरचं अचूक निदान करण्यासाठी सीटी स्कॅन, एमआरआय आणि लिव्हर बायोप्सी यांसारख्या वैद्यकीय चाचण्या केल्या जातात. आजार लवकर ओळखला गेला तर उपचारांचा परिणाम चांगला होतो आणि गंभीर आणि मोठी गुंतागुंत टाळता येऊ शकते.

Liver cancer pain location
Blood Sugar Level: जेवणानंतर तुमची ब्लड शुगर लेवल किती असली पाहिजे? कोणत्या पातळीला असतो डायबेटीजचा धोका?

लिव्हरचा कॅन्सर टाळण्यासाठी उपयुक्त उपाय

तज्ज्ञांच्या मते, काही सोप्या पण प्रभावी सवयी अंगीकारून हा आजार टाळता येऊ शकतो-

  • मद्यपान आणि धूम्रपान टाळा

  • हिपॅटायटिस बीविरोधी लस घ्या

  • संतुलित आणि आरोग्यदायी आहार घ्या

  • लठ्ठपणा आणि फॅटी लिव्हर टाळा

  • नियमित व्यायाम करा

Liver cancer pain location
Diabetes: तुमच्या वयानुसार किती असली पाहिजे ब्लड शुगर लेवल? जाणून घ्या तुमच्या वयासाठी किती प्रमाण योग्य!

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com