Blood Sugar Level Control : आहारात हे बदल करुन पाहाच! रक्तातील साखर राहिल नियंत्रणात; मधुमेह होईल छुमंतर

How To Control Diabetes : टाइप २ मधुमेहासाठी ग्लुकोजची पातळी सुरळीत राखणे महत्त्वाचे आहे.
Blood Sugar Level Control
Blood Sugar Level ControlSaam tv

Diabetes Health :

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) ने यावर्षी जारी केलेल्‍या नवीन आकडेवारीनुसार भारतातील जवळपास १०१ दशलक्ष व्‍यक्‍तींना मधुमेह असण्याचा अंदाज आहे. याच्या तुलनेच २०१९ मध्ये ७० दशलक्ष व्‍यक्‍ती मधुमेहाने पीडित होत्‍या, ज्‍यामधून मधुमेह पीडित व्‍यक्‍तींमध्‍ये मोठी वाढ झाल्‍याचे दि‍सून आली आहे.

तसेच १५.३ टक्‍के व्‍यक्‍ती, म्‍हणजेच जवळपास १३६ दशलक्ष व्यक्‍ती प्रीडायबिटीज असण्‍याचा अंदाज आहे. मधुमेहाच्‍या वाढत्‍या प्रमाणासाठी वाढती लोकसंख्‍या, सामाजिक-आर्थिक स्थिती आणि आहारसंबंधित घटक कारणीभूत असू शकतात. प्रामुख्याने यात बैठेकाम करण्याच्या जीवनशैलीमुळे मधुमेहाच्या प्रमाणात वाढ होताना दिसून आले आहे तसेच. लठ्ठपणा आणि इतर संसर्गजन्य आजारांमध्ये देखील वाढ होत आहे.

Blood Sugar Level Control
Ragi Chilla for Diabetes Health : मधुमेह नियंत्रणात राहिलच! असा बनवा हेल्दी-टेस्टी नाचणीचा चिला

टाइप २ मधुमेहासाठी (Diabetes) ग्लुकोजची पातळी सुरळीत राखणे महत्त्वाचे आहे. तसेच आरोग्यदायी जीवनशैली प्रभावी असणे देखील आवश्यक आहे. तसेच खाण्यापिण्याच्या सवयी सुधारण्यामध्ये वजन नियंत्रणात राखणे देखील गरजेचे आहे.

अॅबॉटच्‍या न्‍यूट्रिशन व्‍यवसायामधील मेडिकल अफेअर्सचे प्रमुख डॉ. इरफान शेख यांनी मधुमेह नियंत्रण करण्यासाठी आपल्याला त्याच्यासोबत जगावे लागते आहे. त्यासाठी आहाराचे योग्य नियोजन असणे गरजेचे आहे.

Blood Sugar Level Control
Low Blood Sugar Tips : अचानक ब्लड शुगर कमी झालं आहे? एनर्जी लेवल वाढवण्यासाठी लगेच खा हे पदार्थ

1. आहाराचे नियोजन करण्‍यापूर्वी विचार करा

मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी आहाराचे (Food) नियोजन करणे गरजेचे आहे. त्यासाठी आहारात कर्बोदके, प्रथिने, मेद आणि योग्य जीवनशैली असायला हवी. या गोष्टींचा सुरुवातीला मेळ जमणे कठीण आहे परंतु, नियमितपणे सेवन केल्यास दैनंदिन नित्यक्रमाचा भाग बनेल. तसेच यात सातत्य असणे महत्त्वाचे.

मधुमेह असणाऱ्यांनी आहारामध्ये पिष्टमय पदार्थ नसलेल्या भाज्या, धान्ये आणि लीन प्रोटीन्स यांचा समावेश करावा. आहारामध्‍ये गहू, पॉलिश न केलेले तांदूळ, ब्राऊन राइस, बार्ली, बकव्हीट, ओट्स, बाजरी, नाचणी, ज्वारी यांसारखे मिलेट्स यांचे अधिक प्रमाणात सेवन करा. केळी, द्राक्षे, आंबा यापेक्षा सफरचंद, पेरू, नाशपाती, संत्री किंवा बेरी यांसारखी फळे सेवन करा. फळांच्या रसांऐवजी संपूर्ण फळे सालीसकट खा. मांसाहार कमी प्रमाणात करा आणि रेड मीट खाणे टाळा. त्‍याऐवजी लीन मीट व चिकनचे सेवन करा.

Blood Sugar Level Control
Bhiwandi One Day Trip: ठाणे जिल्ह्यातील भिंवडीतही आहेत फिरण्याची ठिकाणे; वन डे ट्रिप होईल अविस्मरणीय

2.मधुमेहावर नियंत्रण ठेवण्‍याचा व्‍यायाम गरेजेचा

मधुमेहाविरोधात योग्‍य पोषणासाठी व्‍यायाम (Exercise) महत्त्वाचा आहे. आरोग्‍यदायी आहाराच्‍या सेवनाव्‍यतिरिक्‍त नियमित व्‍यायाम करत तंदुरूस्‍त राहणे हा मधुमेहावर नियंत्रण ठेवण्‍याचा उत्तम मार्ग आहे. नियमितपणे व्‍यायाम केल्‍याने स्‍नायूबल वाढते, रक्‍ताभिसरण सुधारते, कोलेस्‍ट्रॉल पातळ्या व रक्‍तदाब कमी होतो. परिणामत: हृदयाच्या आजारांचा धोका कमी होतो आणि वजन नियंत्रणात राहते.

आजारी असल्‍यास व्‍यायाम करणे टाळा, कारण आजाराशी लढण्‍यासाठी रक्‍तातील ग्लुकोजमध्ये वाढ होते. तसेच रक्‍तातील ग्‍लुकोजची पातळी उच्‍च असल्‍यास आणि पुरेसे इन्‍सुलिन नसल्‍यास व्‍यायाम करणे टाळा, कारण यामुळे ग्‍लुकोजच्‍या पातळ्यांमध्‍ये वाढ होऊ शकते. दैनंदिन नित्‍यक्रमामध्‍ये कोणत्‍याही प्रकारच्‍या व्‍यायामाचा समावेश करण्‍यापूर्वी डॉक्‍टरांचा सल्‍ला घ्‍या.

Blood Sugar Level Control
Marriage Numerology: या दिवशी जन्मलेल्या मुली असतात बेस्ट वाईफ, तुम्ही देखील यात आहात का?

3.तंत्रज्ञानाचा वापर करा

तंत्रज्ञानाचा वापर करुन आपण आहाराच्या नियोजनाचे पालन करु शकतो. फूड-ट्रॅकिंग अॅप्‍लीकेशन्‍स तुमच्‍या दैनंदिन पौष्टिक आहार सेवनाचे नियोजन करण्यास मदत करते. हे अॅप्‍स तुमच्‍या दैनंदिन आहार सेवनाबाबत नोंद करण्‍यास मदत करू शकतात. याव्‍यतिरिक्‍त रेसिपी-शेपिंग ब्‍लॉग्‍स व वेबसाइट्स अत्‍यंत लाभदायी ठरू शकतात, विशेषत: ते प्रत्‍येक रेसिपीसोबत पोषणाबाबत सविस्‍तर माहिती देतात.

4. आरोग्‍यदायी स्नॅक्स पर्यायांची निवड

मधुमेही व्‍यक्‍तींनी स्नॅक्सची निवड करताना अधिक काळजी घेतली पाहिजे. स्नॅक्स हे चौथे भोजन बनले आहे, ज्‍यामुळे कॅलरी व रक्‍तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते. स्नॅक्सची निवड करताना फळे किंवा भाज्‍या अशा पौष्टिक आहाराला प्राधान्‍य द्या. आहाराचे नियोजन करताना त्यात पौष्टिक सप्लीमेण्टचा देखील समावेश करु शकता. सायंकाळच्या वेळी एन्‍शुअर डायबिटीज केअरसह व्‍हॅनिला किंवा चॉकलेट-फ्लेवर्ड मिल्कशेक घेऊ शकता. ज्‍यामुळे रक्‍तातील ग्‍लुकोज पातळी व वजनावर नियंत्रण ठेवण्‍यास मदत होते. योग्‍य सप्‍लीमेण्‍ट्सची निवड करण्‍यासाठी डॉक्‍टरांचा सल्‍ला घ्‍या.

व्यायाम करताना ते अतिशय गुंतागुंतीचे नसावा त्यासाठी लिफ्ट किंवा एलीव्हेटरचा वापर करण्याऐवजी पायऱ्यावरुन चालत जाऊ शकता. तसेच जीवनशैलीमध्‍ये बदल, आहारात बदल किंवा आरोग्‍याचा विचार करा

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com