कोमल दामुद्रे
मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी आपण खाण्यापिण्याच्या अनेक सवयी बदलत असतो.
जर तुम्हालाही रक्तातील साखरचे पातळी नियंत्रणात ठेवायची असेल तर नाश्त्यात बनवा नाचणीचा चिला
नाचणीचे पीठ, दही, हिरव्या भाज्या आणि पाणी
सर्वप्रथम एका भांड्यात नाचणीचे पीठ घेऊन त्यात दही घालून चांगले मिक्स करा
त्यानंतर त्यात आवडीच्या भाज्या बारीक चिरून पीठात मिक्स करा
यानंतर कोमट पाण्यात मिसळून त्याची बारीक पेस्ट तयार करा. पेस्ट अधिक पातळ होणार नाही याची काळजी घ्या
गॅसवर पाणी ठेवून गरम होऊ द्या. यानंतर तव्याभोवती थोडे तूप किंवा तेल लावा.
कढईत तयार पीठ टाकून चिला तयार करा. चटणी किंवा सॉस सोबत सर्व्ह करा