मधुमेहाच्या आजारावर मात करणे कठीणच. व्यस्त जीवनशैलीनुसार खाण्यापिण्याच्या बदलेल्या सवयी, टेन्शन, अपुरी झोप व चहा-कॉफीचे सेवन यामुळे मधुमेहाचा आजार झपाट्याने वाढताना दिसून येक आले.
रक्तात वाढलेली साखर आणि तिचे अचानक कमी होणे यासारखे लक्षणे असतात. ज्यामुळे आरोग्याला हानी पोहोचते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते उच्च रक्तातील साखरेच्या पातळीच्या तुलनेत, कमी रक्तातील साखरेची पातळी आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचे कारण म्हणजे शरीराच्या इतर भागांप्रमाणे मेंदू देखील उर्जेसाठी ग्लुकोजवर अवलंबून असतो. पुरेसे ग्लुकोज न मिळाल्याने स्ट्रोक, हार्ट अटॅक किंवा मेंदूचे घातक नुकसान होऊ शकते.
मधुमेहामुळे (Diabetes) रक्तातील साखरेची पातळी सहसा वेगाने वाढते. तरीही अनेकांना रक्तातील साखर अचानक कमी होण्याचा सामना करावा लागतो. जेवण वगळणे, अति-औषधे, अतिव्यायाम किंवा जड इन्सुलिनमुळे देखील रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते.
जेव्हा एखाद्याच्या रक्तातील साखरेची पातळी कमी होते तेव्हा रताळे फायदेशीर ठरतील. त्यात केवळ फायबर आणि अँटिऑक्सिडंट्सच समृद्ध नसून त्यात कमी ग्लायसेमिक इंडेक्स देखील आहे, जे रक्तातील साखरेची (Sugar) पातळी नियंत्रित करण्यास मदत करते.
तुमच्या रक्तातील साखरेची पातळी सुधारण्यासाठी तुम्ही एक वाटी दह्यासोबत बेरी किंवा नट्स खाऊ शकता. ऊर्जा वाढवण्याबरोबरच, ते कॅल्शियम आणि प्रथिने देईल आणि प्रतिकारशक्ती देखील वाढवेल.
रक्तातील साखर कमी असताना दूध पिणे हा देखील एक चांगला पर्याय आहे. यामध्ये प्रथिने, कॅल्शियम आणि इतर अनेक खनिजे भरपूर प्रमाणात असतात. जर तुम्हाला उर्जा कमी वाटत असेल तर तुम्ही त्यात थोडी साखर देखील घालू शकता.
रक्तातील साखर नियंत्रणात आणण्यासाठी तुम्ही कोणतेही फळ लगेच खाऊ शकता. केळी, सफरचंद, नासपती किंवा संत्री यासारखी फळे (Fruits) भरपूर ऊर्जा देतात. ही फळे ग्लुकोजसोबत फायबरही देतात. द्राक्षे आणि स्ट्रॉबेरी देखील ग्लुकोज संतुलित करण्यासाठी फायदेशीर आहे.
जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही फळांऐवजी सुका मेवा, बदाम, अक्रोड, पिस्ता इत्यादी खाऊ शकता. याशिवाय जेव्हा ग्लुकोज कमी असेल तेव्हा तुम्ही ताज्या फळांचा रस पिऊ शकता. अननस आणि द्राक्षाचा रस खूप फायदेशीर ठरू शकतो.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.