Blood Sugar Level: जेवणानंतर तुमची ब्लड शुगर लेवल किती असली पाहिजे? कोणत्या पातळीला असतो डायबेटीजचा धोका?

Blood Sugar Levels After Eating: रक्तातील साखरेची सामान्य पातळी किती असावी? मुख्य म्हणजे जेवणानंतर रक्तातील साखरेची पातळी किती असली पाहिजे हे जाणून घेऊया.
Blood Sugar Levels After Eating
Blood Sugar Levels After Eatingsaam tv
Published On

आजकाल चुकीचा आहार आणि अयोग्य जीवनशैलीमुळे अनेक आजार आपल्या मागे लागतात. यामध्ये मधुमेहाची समस्या देखील मोठ्या प्रमाणात दिसून येते. केवळ वृद्धांमध्येच नाही तर तरुण आणि लहान मुलांमध्येही ही समस्या सतावताना दिसतेय. मधुमेहाची वेळीच ओळख आणि नियंत्रण करून अनेक मोठे धोके टाळता येऊ शकतात.

मधुमेह या समस्येमध्ये रक्तातील साखरेचं प्रमाण निरीक्षण करावं लागतं. अन्नाचं सेवन केल्यानंतर रक्तातील साखरेच्या पातळीचं निरीक्षण करणं हे मधुमेह ओळखण्यात आणि त्याचं व्यवस्थापन करण्यात मोठी भूमिका बजावतं. ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी आपण मधुमेहाच्या आहारात कोणत्या खाद्यपदार्थांचा समावेश करावा, याची काळजी घेतो. पण अनेकांना हेच कळत नाही की, रक्तातील साखरेची सामान्य पातळी किती असावी? मुख्य म्हणजे जेवणानंतर रक्तातील साखरेची पातळी किती असली पाहिजे हे जाणून घेऊया.

Blood Sugar Levels After Eating
Blood Sugar Level: नॉर्मल ब्लड शुगर लेवल किती असली पाहिजे? मधुमेहाचा धोका कोणत्या पातळीत मानला जातो?

नॉर्मल ब्लड शुगर लेवल किती असली पाहिजे? | What Is A Normal Blood Sugar Level?

रक्तातील ग्लुकोजच्या प्रमाणाला रक्तातील साखरेची पातळी म्हटलं जातं. हा शरीराचा उर्जेचा मुख्य स्त्रोत असून त्याची पातळी दिवसभर बदलते. परंतु सामान्यतः व्यक्तीसाठी सामान्य रक्तातील साखरेची पातळी किती असते ते पाहूयात:

  • रिकाम्या पोटी (फास्टिंग): 70-100 mg/dL

  • जेवणानंतर (Postprandial): 140 mg/dL पेक्षा कमी

Blood Sugar Levels After Eating
पित्ताशय काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया केव्हा करावी? तज्ज्ञांनी सांगितली दिली योग्य माहिती

जेवणानंतर ब्लड शुगर लेवल का वाढते? | Why Does Blood Sugar Level Increase After Eating Food?

ज्यावेळी आपण जेवतो तेव्हा आपले शरीर अन्न पचवतं. यामुळे त्याचं ग्लुकोजमध्ये रूपांतर होतं. हे ग्लुकोज रक्तात जाऊन शरीराच्या अवयवांना ऊर्जा पुरवतं. मात्र ज्यावेळी शरीरामध्ये पुरेश्या प्रमाणात इन्सुलिन तयार होत नाही किंवा शरीराने इन्सुलिनचा योग्य वापर करत नाही तेव्हा रक्तातील साखरेची पातळी वाढू लागते. याला हायपरग्लायसेमिया असं म्हटलं जातं.

Blood Sugar Levels After Eating
Stomach Ulcer: पोटात अल्सर झाल्यानंतर शरीरात दिसून येतात 'हे' बदल; ९९% लोकं करतात इग्नोर

मधुमेह आहे हे कसं समजावं? | How Is Diabetes Diagnosed?

मधुमेहाच निदान करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर नेहमी रक्तातील साखरेच्या काही चाचण्या करतात.

रिकाम्या पोटी ब्लड शुगर टेस्ट:

126 mg/dL यापेक्षा जास्त असेल तर ते डायबिटीजचे संकेत आहेत.

जेवणानंतर ब्लड शुगर टेस्ट:

जेवणाच्या 2 तासांनंतर रक्तातील साखरेचं प्रमाण 200 mg/dL किंवा त्याहून अधिक असल्यास त्याला मधुमेह मानलं जातं.

Blood Sugar Levels After Eating
Swelling In Lungs: फुफ्फुसांना सूज आल्यावर शरीर देतं 'हे' मोठे संकेत; लक्षणं ओळखून वेळीच डॉक्टरांची घ्या मदत

जेवणानंतर रक्तातील ब्लड शुगर कशी नियंत्रणात ठेवावी?

  • योग्य आणि संतुलित आहार

  • नियमित व्यायाम करा

  • स्ट्रेस मॅनेजमेंट

  • ब्लड शुगर लेवल तपासा

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com