
आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव हा महत्त्वाचा मानला जातो. फुफ्फुस हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा अवयव असून जो श्वास घेण्याच्या प्रक्रियेत मुख्य भूमिका बजावतो. शुद्ध हवा घेण्यास आणि कार्बन डाय ऑक्साईड सोडण्यात फुफ्फुसांची मोठी भूमिका असते. शरीर निरोगी ठेवण्यासाठी फुफ्फुसं निरोगी असणं गरजेचं आहे. मात्र आजकाल चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि खराब जीवनशैलीमुळे लोकांमध्ये फुफ्फुसांशी संबंधित समस्या सामान्य झाल्या आहेत. यामधील एक समस्या म्हणजे फुफ्फुसात सूज येण्याची समस्या.
फुफ्फुसात सूज आल्याने दमा, न्यूमोनिया आणि ब्राँकायटिस यासारख्या अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. संसर्ग, ऍलर्जी, धूळ, धूम्रपान या अशा अनेक कारणांमुळे फुफ्फुसात सूज येण्याची समस्या तुम्हाला जाणवू शकते. ज्यावेळी फुफ्फुसात जळजळ होते तेव्हा हवा आत येण्याचे मार्ग अरुंद होतात. त्यामुळे व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. मुळात फुफ्फुसात सूज आली की, शरीरात अनेक प्रकारची लक्षणं दिसतात. ही लक्षणं वेळीच ओळखली गेली तर उपचार करणं शक्य आहे
फुफ्फुसात सूज आल्याने तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होण्याची शक्यता आहे. या स्थितीत व्यक्तीला असं वाटू शकतं की, तो पूर्णपणे श्वास घेऊ शकत नाही. तुम्हालाही अशी लक्षणे जाणवत असतील तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा.
फुफ्फुसात सूज आल्यास एखाद्या व्यक्तीला सतत खोकल्याचा त्रास होऊ शकतो. जर तुम्हाला दीर्घकाळ खोकल्याचा त्रास होत असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
फुफ्फुसात सूज आल्यावर छातीत दुखण्याची समस्या जाणवू शकते. यावेळी श्वास घेताना किंवा खोकताना ही वेदना वाढू शकते. फुफ्फुसात सूज आल्याने तुमच्या छातीवर दाब येतो. त्यामुळे छातीत दुखू लागू शकतं. अशी लक्षणं दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा.
अत्यंत थकवा आणि अशक्तपणा जाणवणं हे देखील फुफ्फुसात जळजळ होण्याचं लक्षण असू शकते. ज्यावेळी फुफ्फुसांमध्ये सूज येते तेव्हा ऑक्सिजन शरीरात योग्यरित्या पोहोचू शकत नाही. त्यामुळे व्यक्तीला खूप थकवा जाणवण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्हालाही हा त्रास जाणवत असेल तर इग्नोर करू नका.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.