
आजच्या धावपळीच्या जगात ताण हा जवळपास प्रत्येकालाच असतो. कामाच्या डेडलाईन्स, वाढत्या जबाबदाऱ्या, ट्रॅफिकमधील वेळखाऊ प्रवास आणि मोबाईलवरील सततच्या नोटिफिकेशन्समुळे तणाव कायमस्वरूपी सोबत असतो. मात्र हा फक्त मानसिक त्रास नाही, तर शरीरावरही त्याचा खोलवर परिणाम होतो विशेषतः आपल्या हृदयावर.
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी तणाव दीर्घकाळ तुमच्यावर असतं त्यावेळी तेव्हा शरीर आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज असावं अशा स्थितीत सतत राहायला लागतं. कोर्टिसोल आणि अॅड्रेनालिन हे हॉर्मोन्स सुरुवातीला संकटातून बाहेर पडण्यासाठी उपयोगी असतात, पण हेच हार्मोन्स शरीरात जास्त वेळ राहिल्यास हृदयावर ताण वाढतो. त्यामुळे हृदयाचे ठोके वाढतात, रक्तदाब वाढतो आणि हळूहळू रक्तवाहिन्यांमध्ये inflammation निर्माण होतं.
अनेकदा ३०-४० वयोगटातील ठणठणीत दिसणाऱ्या लोकांनाही हृदयविकाराची सुरुवातीची लक्षणं दिसतात. विशेष म्हणजे ‘सायलेंट हार्ट अटॅक’ यांचं प्रमाण वाढत चाललंय. यामध्ये लक्षणं सौम्य स्वरूपाची असतात, जसं छातीत अस्वस्थता, अपचन, किंवा थकवा. त्यामुळे लोक ती दुर्लक्षित करतात. पण ही दुर्लक्ष केलेली लक्षणं पुढे जिवावर बेतू शकतात.
पूर्वी हृदयाचे आजार म्हटलं की, पन्नाशीनंतरची काळजी वाढायची. मात्र आता या वयात घट झाली असून वयात घट होऊन तीसच्या आत आलं आहे. उशिरा झोपणं, वेळेवर न खाणं, तासनतास स्क्रीनसमोर बसणं आणि सतत तणावात असणं या सवयी तरुण पिढीत हृदयाच्या आरोग्यासाठी घातक ठरतायत.
अशावेळी जागरणासाठी कॉफीचा अति वापर, तणावावर सिगारेट, जंक फूड या सवयी असतात. यांचा हृदयावर अतिरिक्त भार पडतो. दीर्घकाळ अशा वागणुकीमुळे हृदयावर गंभीर परिणाम होत जातो.
हृदयाचं आरोग्य राखणं म्हणजे मोठी कठीण गोष्ट नाही. उलट साध्या सवयींच्या बदलातून सुरुवात करता येते. दररोज अर्धा तास शरीरिक हालचाल करणं, संतुलित आहार घेणं, झोपेची वेळ निश्चित ठेवणं आणि स्क्रीनपासून थोडा वेळ दूर राहणं हे सर्व बदल हृदयासाठी फायद्याचे आहेत. त्याचप्रमाणे योगासारख्या पद्धती, श्वसनाचे व्यायाम किंवा ऑफिसच्या वेळेत हालचाल या गोष्टी तणाव कमी करतात आणि हृदयाला आधार देतात.
आज अनेक लोक असा विचार करतात की लक्षणं दिसल्यावर डॉक्टरकडे जाऊ. पण अनेकदा छातीत दुखणं हे पहिलं आणि शेवटचं लक्षण असतं. म्हणूनच वेळेवर तपासण्या करून, हृदयाच्या आरोग्याची स्थिती जाणून घेणं खूप आवश्यक आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉलसारखे आजार असलेल्या लोकांनी वर्षातून एकदा हृदयाच्या तपासण्या केल्याच पाहिजेत.
भारतासारख्या देशात हृदयविकार ही मोठी आरोग्यसमस्या बनलीये. प्रत्येक चार मृत्यूपैकी एक मृत्यू हृदयविकारामुळे होतो. विशेषतः तरुणांमध्ये या घटनांचं प्रमाण झपाट्याने वाढतंय. यामध्ये त्रास सुरू होण्याआधीच काही वेळा मृत्यू होतो. त्यामुळे वेळीच निदान होणं हे केवळ गरजेचं नाही, तर ते जीव वाचवण्यासाठीही फायदेशीर ठरतं.
आजकाल स्मार्टवॉचेससुद्धा अनियमित हृदयाच्या ठोक्यांबाबत अलर्ट देतात. ज्यांच्या कुटुंबात हृदयविकाराचं इतिहास आहे किंवा डायबेटीस, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा यासारखे आजार आहेत त्यांनी ३० वर्षांनंतर दरवर्षी हृदय तपासणं सुरू केलं पाहिजे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.