Surabhi Jayashree Jagdish
नखं केवळ हातांचं सौंदर्य वाढवतात नाही तर तुमच्या आरोग्याचीही माहिती देतात.
नखांवर असलेल्या रेषा पौष्टिकतेची कमतरता किंवा कोणत्याही आरोग्य समस्येचे संकेत देतात.
नखांवर असलेल्या रेषांचा अर्थ काय आहे ते जाणून घेऊया.
जसं वय वाढतं तसं नखांमध्ये हलक्या आणि सरळ रेषा येणं सामान्य आहे.
परंतु कधीकधी त्या हायपोथायरॉईडीझम आणि त्वचेच्या समस्यांमुळे देखील होऊ शकतात.
जर तुमच्या नखांवर काळ्या रेषा तयार होऊ लागल्या असतील तर ते व्हिटॅमिन सी, झिंक आणि इतर पोषक तत्वांच्या कमतरतेचं लक्षण आहे.
आहारात व्हिटॅमिन सी, झिंक आणि इतर पोषक तत्वांचा समावेश करा.
जर या रेषा अधिक दिसत असतील तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.