ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पावसाळ्याच्या दिवसात तुम्हीही फिरायला जायचा तुम्ही प्लॅन करत असलाच
मात्र तुम्हाला केवळ एकाच दिवसाची सुट्टी असेल आणि तुम्हाला जवळच्या परिसरात फिरायचं असेल तर ही स्टोरी तुमच्यासाठी आहे.
पावसाळ्यात मालाड आणि त्याच्या आसपास फिरण्यासाठी अनेक निसर्गरम्य आणि शांत ठिकाणं आहेत.
पावसात फार गर्दी नसते, म्हणून शांत वेळ घालवण्यासाठी मार्वे बीच ही योग्य जागा आहे.
मार्वे ते मनोरी बोटीने जाता येतं. पारंपरिक कोळी संस्कृतीचा अनुभव तुम्हाला या ठिकाणी मिळेल.
मढ आयलंड हे समुद्रकिनारी वसलेले थोडेसे शहरापासून लांब आहे. पावसात हिरवळ आणि समुद्राचे दृश्य दोन्ही मनमोहक असतं.
हे मालाडपासून जवळ असलेल्या बोरीवलीमध्ये आहे. या ठिकाणी कान्हेरी लेणी आणि पावसाळ्यात धबधब्यांचा अनुभव घेता येतो.