Sakshi Sunil Jadhav
अमरावती शहरातील नानकरामजी दहीवडेवाले यांच्या दुकानात कांजी वडा मिळतो आणि तो स्थानिकांसह बाहेरून येणाऱ्या लोकांमध्येही लोकप्रिय आहे.
या ठिकाणी मिळणारा कांजी वडा केवळ 30 रुपयांत उपलब्ध असल्याने अनेकजण आवडीने याचा आस्वाद घेतात.
गिला वडा प्रसिद्ध असलेल्या अमरावती शहरात आता कांजी वडा देखील खाद्यप्रेमींमध्ये वेगाने लोकप्रिय होत आहे.
कांजी वडा हा उत्तर भारतातील, विशेषतः मध्य प्रदेशातील इंदूर, राजस्थान आणि दिल्ली परिसरातील एक पारंपरिक पदार्थ मानला जातो.
हा पदार्थ पचनासाठी चांगला मानला जातो. त्यामुळे अनेक ठिकाणी तो औषधी गुणधर्म असलेला पदार्थ म्हणूनही ओळखला जातो.
कांजी म्हणजे मोहरी, मीठ आणि हिंग घालून तयार केलेले विशेष पाणी. हे पाणी थोड्या वेळात आंबटसर चव घेतं.
साध्या पाण्यात मोहरी, मीठ आणि हिंग घालून ते पाणी 2 ते 3 तास उन्हात झाकून ठेवतात, त्यामुळे त्याला हलका आंबट सुवास येतो.
यानंतर त्या कांजीमध्ये उडीद डाळ किंवा मुगाच्या डाळीचे वडे टाकले जातात.
कांजीच्या आंबटसर पाण्यात वडे भिजल्यामुळे या पदार्थाला एक वेगळी आणि खास चव मिळते.