Heart Attack Women: सावधान! हार्ट अटॅक येण्याच्या महिनाभरआधी महिलांमध्ये दिसतात ही सामान्य लक्षणं, दुर्लक्ष करणं ठरेल घातक

Heart Attack Health: महिलांमध्ये हृदयविकाराची लक्षणे अनेकदा वेगळी आणि सूक्ष्म असतात. योग्य वेळी ओळख न झाल्यास धोका वाढतो. त्यामुळे लक्षणे जाणून घेऊन वेळेवर उपचार घेणे अत्यंत गरजेचे आहे.
Early Signs of Heart Attack
Heart Attack Symptoms In WomenGOOGLE
Published On

हृदयविकार हा फक्त पुरुषांनाच होणारा आजार आहे, असा समज अनेकांमध्ये आढळतो. मात्र, प्रत्यक्षात तो महिलांसाठीही एक मोठा आरोग्यधोका आहे आणि त्याबाबत तितकीच जागरूकता आवश्यक आहे. भारतात हृदयविकारामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण वाढत असून, महिलांमध्येही हा धोका लक्षणीयरीत्या वाढत आहे.

हृदयविकारासाठी सामान्य जोखमीचे घटक म्हणजे उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल, लठ्ठपणा आणि धूम्रपान. याशिवाय महिलांमध्ये काही अतिरिक्त जोखमीचे घटकही आढळतात, जसे की गर्भावस्थेतील मधुमेह (gestational diabetes), पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS), ताण-तणाव, चिंता, हार्मोनल बदल (विशेषतः मेनोपॉजनंतर) आणि ऑटोइम्यून आजार. हे सर्व घटक हृदयविकार होण्याची शक्यता वाढवतात.

महिलांमध्ये हृदयविकार ओळखण्याचे एक मोठे आव्हान म्हणजे त्यांची लक्षणे पुरुषांपेक्षा वेगळी असतात. छातीत दुखणे किंवा डाव्या हातात वेदना ही सर्वसाधारण लक्षणे मानली जातात, परंतु महिलांमध्ये अटिपिकल अँजायना (असामान्य लक्षणे) अधिक दिसून येतात. ही लक्षणे सूक्ष्म असतात आणि अनेकदा दुर्लक्षित राहतात किंवा चुकीच्या पद्धतीने समजली जातात.

Early Signs of Heart Attack
Kokan Top 10 Places: कोकणात फिरायला जात असाल तर ही TOP 10 ठिकाणं नक्की पाहा, हिरव्यागार निसर्गात जाल हरवून

लक्ष देण्यासारखी महत्त्वाची लक्षणे:

मान, जबडा, खांदा किंवा वरच्या पाठीमध्ये वेदना

जास्त घाम येणे

मळमळ किंवा उलटी होणे

श्वास घेण्यास त्रास होणे

पाठीमध्ये किंवा पोटात जडपणा जाणवणे

अ‍ॅसिडिटीसारखी जळजळ होणे

अचानक तीव्र थकवा किंवा अशक्तपणा जाणवणे

ही लक्षणे स्पष्ट नसल्यामुळे ती अनेकदा अ‍ॅसिडिटी, थकवा किंवा इतर साध्या समस्यांप्रमाणे समजली जातात. त्यामुळे योग्य वेळी उपचार घेण्यात उशीर होऊ शकतो. याशिवाय, अनेक महिला स्वतःच्या आरोग्यापेक्षा कुटुंबाच्या गरजांना प्राधान्य देतात, ज्यामुळे उपचार घेण्यास आणखी उशीर होतो.

महिलांमध्ये हृदयाच्या छोट्या रक्तवाहिन्यांवर (microvascular disease) परिणाम होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे निदान करणे अधिक गुंतागुंतीचे होते आणि आजार उशिरा लक्षात येण्याची शक्यता वाढते. यामुळे अनेक वेळा तपासण्या सामान्य दिसूनही समस्या गंभीर असू शकते.

प्रतिबंधासाठी काय करावे?

नियमित आरोग्य तपासणी (BP, शुगर, कोलेस्टेरॉल) करून घ्या

संतुलित आहार घ्या आणि फळे-भाज्यांचा समावेश वाढवा

दररोज किमान 30 मिनिटे व्यायाम करा

ताण-तणाव नियंत्रित ठेवण्यासाठी योग किंवा ध्यान करा

धूम्रपान आणि मद्यपान टाळा

पुरेशी झोप घ्या

वेळीच उपचार का महत्त्वाचे?

हृदयविकाराचा झटका हा आपत्कालीन स्थिती आहे. लक्षणे दिसताच तात्काळ वैद्यकीय मदत घेणे अत्यंत आवश्यक आहे. वेळेत उपचार मिळाल्यास हृदयाचे नुकसान टाळता येते आणि जीव वाचण्याची शक्यता वाढते. या फरकांबाबत जागरूकता वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. लक्षणे लवकर ओळखणे, वेळेवर वैद्यकीय तपासणी करणे आणि योग्य उपचार घेणे यामुळे गंभीर परिणाम टाळता येऊ शकतात. महिलांना योग्य माहिती देणे हे हृदयविकाराच्या प्रतिबंध आणि व्यवस्थापनासाठी महत्त्वाचे पाऊल आहे. डॉ. विशाल पिंगळे, हृदयतज्ज्ञ, सैफी हॉस्पिटल, मुंबई यांनी ही महत्वाची माहिती दिली आहे.

Early Signs of Heart Attack
Jio Cheapest Recharge: खुशखबर! Jio चा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान; वर्षभर वापरा पण किंमती फक्त एवढीच...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com